Oommen Chandy Passes Away: केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाल्याची भावना आहे. त्यांना ज्येष्ठ नेत्यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. दीर्घ आजारानंतर वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. केरळच्या राजकारणात ओमान यांना खूप मानलं जात होतं. ते दोन वेळा केरळचे मुख्यमंत्री होते आणि 12 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी इतर अनेक पदांवर काम केले. ओमान चंडी हे वयाच्या 26 व्या वर्षी पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले. 1970 मध्ये पुथुपल्ली मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक जिंकून केरळ विधानसभेत आले. विशेष म्हणजे हा भाग त्यांचा गड मानला जात होता. जवळपास 50 वर्षे ते इथली एकही निवडणूक पराभूत झाले नाहीत. 2021 मध्ये त्यांनी शेवटची निवडणूक लढवली होती. पुथुपल्लीची जागा 5 दशके सातत्याने काँग्रेसकडे राहिली. सध्या या जागेवर काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. जी ओमान चंडी यांच्या काळात होती. चंडी यांनी येथून 1970, 1970, 1977, 1980, 1982, 1987, 1991, 1996, 2001, 2006, 2011, 2016 आणि 2021 मध्ये निवडणूक लढवली होती. ओमान चंडी यांनी दोनवेळा मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला आहे. 2004 ते 2006 आणि 2011 ते 2016 या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. याशिवाय 2006 ते 2011 पर्यंत ओमान केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ओमान चंडी यांचे नाव त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दोन घोटाळ्यांमध्ये समोर आले. केरळचे अर्थमंत्री असताना त्यांचे नाव पामोलिन घोटाळ्यात समोर आले. 1991 च्या या घोटाळ्याने केरळच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होता. याशिवाय केरळमधील सौरऊर्जा घोटाळ्यातही त्यांचे नाव पुढे आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.