जाहिरात
मराठी बातम्या / देश / PM Modi in UP: 'ट्रिपल तलाक' पीडित महिलांना पंतप्रधान मोदींनी दिला स्वालंबनाचा कानमंत्र

PM Modi in UP: 'ट्रिपल तलाक' पीडित महिलांना पंतप्रधान मोदींनी दिला स्वालंबनाचा कानमंत्र

PM Modi in UP: 'ट्रिपल तलाक' पीडित महिलांना पंतप्रधान मोदींनी दिला स्वालंबनाचा कानमंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील ट्रिपल तलाक (Triple Talaq) पीडित महिलांना स्वावलंबनाचा कानमंत्र दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election 2022) तयारी सुरू केली आहे.  मोदी मंगळवारी कानपूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी ट्रिपल तलाक (Triple Talaq) झालेल्या महिलांशी संवाद साधला. तसंच त्यांना स्वावलंबी होण्याचा मंत्र देखील सांगितला.‘तुमच्या मुलींना शिकवा. त्यानंतर त्या पूर्णपणे स्वावलंबी होतील,’ असा कानमंत्र मोदींनी यावेळी दिला. कानपूरमधील फरझाना या महिलेशी मोदींनी यावेळी संवाद साधला. त्यांना नवऱ्यानं चार वर्षांपूर्वी ट्रिपल तलाक दिला आहे. फरझाना आता एक खाद्यपदार्थाचा छोटा उद्योग चालवतात. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या अंतर्गत ( PM Svanidhi scheme) त्यांना लॉक डाऊनमध्ये या उद्योगासाठी कर्ज मिळाले आहे. पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबरोबर फोटो काढण्याची इच्छा फरझाना यांनी व्यक्त केली. त्यांना हा फोटो त्यांच्या दुकानात ठेवायचा आहे. मोदींनी तात्काळ ती इच्छा मान्य केली. पंतप्रधानांनी आठवडाभरापूर्वीच प्रयागराजमध्ये शबाना परवीन आणि त्यांच्या नऊ महिन्याच्या मुलीशी संवाद साधला होता. परवीन यांनी बँक कर्मचारी म्हणून केलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा केली होती.

जाहिरात

सरकारी योजनेचा लाभ झालेल्या 25 लाभार्थींपैकी फरझाना एक आहे. ‘मी आज माझ्या दोन मुलींना तुमच्यामुळे शिक्षण देऊ शकते. माझ्या मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं ही माझी इच्छा आहे. मी खूप वाईट दिवस सहन केले आहेत. चार वर्षांपूर्वी नवऱ्याने मला तलाक दिला आणि दोन लहान मुलींसह मला त्याचे घर सोडावे लागले. माझा खटला अद्याप कोर्टात प्रलंबित आहे. माझ्या मुलींना घर नाही.’ अशी व्यथा  त्यांनी पंतप्रधनांजवळ व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात