नवी दिल्ली, 25 डिसेंबर: हिंदू आणि हिंदुत्व (Hindu and Hinduism) यांचा एकमेकांशी काहीही (No relation to each other) संबंध नाही, असं स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग (Digvijay Singh) यांनी केलं आहे. राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदुत्व यातील फरक सांगणारं वक्तव्य केल्यापासून काँग्रेसचे नेते या विषयावरून संधी मिळेल, तेव्हा या विधानाचं समर्थन करत असल्याचं चित्र आहे.
सावरकर ने अपनी किताब में लिखा है कि हिंदू धर्म का हिंदुत्व के साथ कोई संबंध नहीं है। उन्होंने यह भी लिखा है कि गाय ऐसा पशु है जो खुद के मल में लोट लेती है, वह कहां से हमारी माता हो सकती है, उसके गोमांस खाने में कोई खराबी नहीं है। यह सावरकर ने कहा है: कांग्रेस नेता दिग्विजय सिंह pic.twitter.com/ClP4pdNJDI
— ANI_HindiNews (@AHindinews) December 25, 2021
काय म्हणाले दिग्विजय सिंग
काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी हिंदू आणि हिंदुत्व यावरून वक्तव्य केलं आहे. हिंदू आणि हिंदुत्वाचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं विधान स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात केलं होतं. गाय हा स्वतःच्याच शेणात लोळणारा प्राणी असून ती काही आपली माता असू शकत नाही, असंही सावरकर म्हणाले होते. गायीचं मांस खाण्यात काहीही अडचण नसल्याचंही दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे.
यह देश विविधताओं का देश है। यहां ऐसे भी हिंदू है जो गोमांस खाते हैं और कहते हैं कहां लिखा है गोमांस ना खाया जाएं और अधिकांश हिंदू गोहत्या के ख़िलाफ़ है: कांग्रेस नेता दिग्विजय सिंह, भोपाल, मध्य प्रदेश pic.twitter.com/T0xTSWGApv
— ANI_HindiNews (@AHindinews) December 25, 2021
सावरकरांचा दिला संदर्भ
यातील सर्व विधानं सावरकरांची असून त्यातील एकही वाक्य हे आपले मत म्हणून आपण सांगत नसल्याचा दावाही दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्व यातील फरकाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता असून उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयावर गरमारम चर्चा रंगण्याची चिन्हं आहेत.
हे वाचा - News: लुधियाना Blast प्रकरणातल्या मास्टरमाईंड संदर्भात मोठी बातमी
विविधतेचा देश
हा देश वैविध्यपूर्ण असून प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रथा आणि पद्धती असल्याचं दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. गोमांस खाऊ नये, असं कुठल्याही ग्रंथात सांगण्यात आलेलं नसून अनेक हिंदूंना ते मान्य नसल्याचं दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अनेक हिंदू हे गोहत्येच्या विरोधात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cow science, V.D. Savarkar, काँग्रेस