मराठी बातम्या /बातम्या /देश /पंतप्रधान मोदींनी दिलं शेतकरी आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण; म्हणाले, MSP कायम राहणार!

पंतप्रधान मोदींनी दिलं शेतकरी आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण; म्हणाले, MSP कायम राहणार!

'आपल्याला पुढे जायचे आहे, मागे जायचे नाही. विरोधक असेल किंवा आंदोलक असेल सर्वांना सुधारण्यासाठी संधी दिली पाहिजे'

'आपल्याला पुढे जायचे आहे, मागे जायचे नाही. विरोधक असेल किंवा आंदोलक असेल सर्वांना सुधारण्यासाठी संधी दिली पाहिजे'

'आपल्याला पुढे जायचे आहे, मागे जायचे नाही. विरोधक असेल किंवा आंदोलक असेल सर्वांना सुधारण्यासाठी संधी दिली पाहिजे'

नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी : कृषी कायदे रद्द (agriculture act 2020) करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (farmers protest) करत आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'MSP कायम राहणार आहे, चर्चेची दारं कायम उघडी आहे, आंदोलन थांबवावे' असं आवाहन राज्यसभेतून केले आहे.

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन सादर करत कृषी कायदे आणि आंदोलकावरून भाष्य केले.

'कृषीमंत्री तोमर हे शेतकरी आंदोलकांशी बोलत आहे, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजून कोणताही तणाव निर्माण झालेला नाही. आंदोलन करणे तुमचा हक्क आहे, पण वयोवृद्ध शेतकऱ्यांनी तिथे बसवणे योग्य नाही. तुम्ही आंदोलन मागे घेतल्यानंतर सुद्धा चर्चा करू शकता. चर्चा करण्यासाठी मी राज्यसभेच्या माध्यमातून निमंत्रण देत आहे. चर्चेतूनच मार्ग सुटणार आहे, असं आवाहनही मोदींनी केले.

'ही गोष्ट निश्चित आहे, शेती विकसित करण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावे लागणार आहे, आपल्याला पुढे जायचे आहे, मागे जायचे नाही. विरोधक असेल किंवा आंदोलक असेल सर्वांना सुधारण्यासाठी संधी दिली पाहिजे. तसंच, एमएसपी आहे, एमएसपी कायम राहणार आहे. देशातील लोकांना स्वस्त धान्य दिले जात आहे, ते कायम राहणार आहे,असंही त्यांनी ठामपणे सांगितले.

शरद पवारांना टोला

'शरद पवार यांनी शेती कायदे सुधार करण्यासाठी प्रयत्न केले. शरद पवार यांनी शेती कायद्यात सुधार करण्यास मत व्यक्त केले होते. पण त्यांनी कायद्याला विरोध केला नाही. आज आम्ही चांगले विचार मांडले याचा अर्थ असा नाही की 10 वर्षानंतर चांगले विचार असू शकत नाही. पण अचानक यू-टर्न का घेतला हे मात्र कळू शकले नाही. तु्म्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकता की, नवीन कायदे आहे ते स्वीकारले पाहिजे' असा टोला मोदींनी शरद पवारांना लगावला.

मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा उल्लेख

नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणातील मुद्देच राज्यसभेत वाचून दाखवले. 'शेतकऱ्यांना पिक विकण्यासाठी स्वातंत्र्य, भारताला स्वतंत्र्य कृषी बाजार मिळवून देण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले होते. आता त्यांनी जे सांगितले होते तेच आम्ही करत आहे. उलट तुम्हाला याबद्दल अभिमान वाटायला हवा होता, असा टोलाही मोदींनी लगावला.

First published:

Tags: Delhi, Farmer protest, Pm in rajyasabha, PM Naredra Modi