भोपाळ, 12 एप्रिल : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालून फिरण्याचं आवाहन केलं जात आहे. याच मास्कची मस्करी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मास्कची मस्करी करणाऱ्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. ’ इस कपड़े के टुकड़े पर क्या भरोसा रखना, रखना है तो उस ऊपर वाले पर रखो.’ असं म्हणणाऱ्या 25 वर्षीय टीकटॉक स्टारला कोरोनाची लागण झाली आहे. बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये त्याला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सागर जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हे वाचा- हातात 22 दिवसांचं बाळ,पण कोरोनाला रोखण्यासाठी या महापालिकेच्या आयुक्त कामावर हजर एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार या तरुणानं क्वारंटाइनदरम्यान आणखी एक टीकटॉक व्हिडीओ तयार केला होता. मेरे लिए प्रार्थना करो, दोस्तो. हा शेवटचा टीकटॉक व्हिडीओ आहे. त्यानंतर या टीकटॉक स्टारकडून मोबाईल काढून घेतला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा वाढला, रुग्णांची संख्या 1895 वर महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे. महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. हे वाचा- आयसोलेशनमध्ये गर्भवती महिलेवर दोन दिवस केला बलात्कार, आईसोबत बाळाचाही मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.