मुंबई, 20 एप्रिल : देशभरात कोरोनाची (Corona) दुसरी लाट येऊन धडकली आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) दिल्ली (Delhi), मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये परिस्थितीत बिकट होत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना मदतीसाठी पुढे येण्यास आवाहन केले आहे. जर सर्वांनी सोबत येऊन मदत केली तर लॉकडाऊनची गरज लागणार नाही, असं आवाहन केले. कोरोनाच्या परिस्थिती देशात बिकट होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना मास्क आणि सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन केले आहे. ‘देशाला लॉकडाऊन पासून वाचवायचं आहे, राज्य सरकारने सुद्धा लॉकडाऊनचा पर्याय हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडला पाहिजे, असं आवाहनही मोदींनी केले. जे दु:ख तुम्ही सहन करत आहे. त्याचे मला दु;ख आहे. मागील काही दिवसांमध्ये ज्यांनी आपल्या लोकांना गमावले असेल त्यांच्याबद्दल मी सहवेदना व्यक्त करत आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मी तुमच्या दुखात सहभागी आहे’, अशी भावना मोदींनी व्यक्त कली. देशात आलेल्या संकटात सर्व परिस्थितीशी तोंड देण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. देशातील आरोग्य सेवक रात्रंदिवस काम करत आहे. मागे जे काही निर्णय घेण्यात आले होते, देशातील परिस्थिती पाहून घेण्यात आले होते, देशात अनेक भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे केंद्र, राज्य आणि खासगी क्षेत्र पूर्ण ताकदीने काम करत आहे. सर्वांना आक्सिजन मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात नवे ऑक्सिजन प्लांट असावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. आज जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान जास्त प्रमाणात औषधांची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहितीही मोदींनी दिली. ‘तज्ज्ञ व्यक्तींसोबत चर्चा केली आहे. औषधाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहे. आपल्या देशात मजबूत फार्मा कंपन्या आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये विशाल कोविड सेंटर तयार केले जात आहे. मागील वर्षी कोरोनाचे विषाणू आढळून आले होते, तेव्हा प्रभावी कोरोना व्हॅक्सिन तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. लोकांना मोठ्या प्रमाणात लशी देण्यात आल्या आहेत. गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात लशी देण्यात आल्या आहे, असंही मोदी म्हणाले. आज कोरोनाच्या लढाईत आपल्याला हेल्थ वर्कर,फ्रन्ट लाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आता 18 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात जी लस तयार केली जाईल, त्याचा हिस्सा हा राज्य आणि रुग्णालयांना मिळणार आहे. 45 वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू आहे. त्यांनाही लस देण्याची मोहीम सुरूच राहणार आहे, असंही मोदींनी स्पष्ट केले. ‘मागील वर्षी जी परिस्थिती होती, त्यावेळी आपल्याकडे लढण्यासाठी पीपीई कीट, ग्लोज, मास्क नव्हते. आता त्यात आपण सुधार केला आहे. यात आपल्या डॉक्टरांनी विशेष प्राविण्य मिळाले आहे. आतापर्यंत कोरोनाशी लढा देत असताना आपण मोठ्या हिंमतीने लढा दिला. याचे श्रेय तुम्हाला जाते. त्यामुळे मला विश्वास आहे की, आपण कोरोनाची लढा देऊ शकतो. अनेक लोकं, सामाजिक संस्था लोकांना मदत करत आहेत. या संकटाच्या वातावरणात गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढ यावे, लोकांच्या मदतीतून आपण कोरोनावर मात करू शकतो. तरुणांनी आपल्या सोसायट्यांमध्ये येऊन समिती स्थापन करून कोरोनाचे नियम पाळण्याबद्दल जागृकता करावी. जर आपण सर्वांनी नियम पाळले तर लॉकडाऊनची गरजच नाही, असंही मोदी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.