मराठी बातम्या /बातम्या /देश /कोट्यवधींचा अत्तर व्यापारी पीयूष जैनला अटक, 257 कोटींपेक्षा जास्त रक्कम जप्त

कोट्यवधींचा अत्तर व्यापारी पीयूष जैनला अटक, 257 कोटींपेक्षा जास्त रक्कम जप्त

Piyush Jain

Piyush Jain

उत्तर प्रदेशच्या कनौरमध्ये अत्तर व्यापारी पीयूष जैन(Piyush Jain ) याला अखेर कानपूरमधून अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 27 डिसेंबर: उत्तर प्रदेशच्या कनौरमध्ये अत्तर व्यापारी पीयूष जैन(Piyush Jain ) याला अखेर कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. पीयूष जैनला जीएसटी इंटेलिजन्स विभागाने अटक केली. अब्जावधी रुपयांचा जीएसटी भरला नसल्याचा आरोप पीयूष जैन करण्याता आला आहे. तसेच, 257 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त केली आहे.

जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून पीयूष जैन आणि त्याच्या मुलाच्या संपत्तीची तपासणी केली. यानंतर 257 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त केली. तसेच सोने, चांदी आणि हिरे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या संपत्तीबाबत अद्याप पीयूष जैन आणि त्याच्या मुलाने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे समजते.

जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजीएसटी कलम 69 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. पीयूष जैनच्या कन्नौजमधील घरात एक तळघर आढळले तसेच घरात 300 अशा चाव्या सापडल्या ज्यांच्या कुलुपांचा शोध अद्याप सुरू आहे.

कानपूरमधील बहुतांश पान मसाला उत्पादक पीयूष जैन यांच्याकडून पान मसाला कंपाऊंड खरेदी करतात.जीएस

टी इंटेलिजन्स महानिर्देशनालय म्हणजेच डीजीजीआय आणि आयकर विभागाच्या पथकानं कन्नौजच्या अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्या कानपूर येथील घरावर छापा मारला होता. यात जैन यांच्या कपाटात इतकी रक्कम सापडली होती की ती मोजण्यासाठी काऊंटिंग मशीन मागवाव्या लागल्या होत्या. एकूण ८ मशीनचा वापर करुन पैसे मोजले जात होते.

एजन्सी जैन यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या?

हमदाबादच्या डीजीजीआय टीमने एक ट्रक पकडला होता. या ट्रकमध्ये जाणाऱ्या मालाचे बिल बनावट कंपन्यांच्या नावाने बनवण्यात आले होते. सर्व बिले 50 हजार रुपयांपेक्षा कमी होती, त्यामुळे Eway बिल करावे लागणार नाही. यानंतर डीजीजीआयने कानपूरमधील ट्रान्सपोर्टरच्या जागेवर छापा टाकला. येथे डीजीजीआयला सुमारे 200 बनावट बिले मिळाली. येथूनच डीजीजीआयला पीयूष जैन आणि बनावट बिलांचे काही कनेक्शन कळले.

यानंतर डीजीजीआयने उद्योगपती पीयूष जैन यांच्या घरावर छापा टाकला. अधिकारी जैन यांच्या घरी पोहोचताच कपाटात नोटांचे बंडले पडलेले दिसले. त्यानंतर आयकर विभागाला माहिती देण्यात आली. तेव्हापासून या एजन्सींच्या अत्तर व्यवसायावर कारवाई सुरू आहे.

First published:

Tags: GST