जाहिरात
मराठी बातम्या / देश / विमानाच्या कॉकपिटमध्ये गर्लफ्रेंड : DGCA ची मोठी कारवाई, थेट Air India च्या CEO आणि फ्लाइट सेफ्टी हेडला पाठवली नोटिस

विमानाच्या कॉकपिटमध्ये गर्लफ्रेंड : DGCA ची मोठी कारवाई, थेट Air India च्या CEO आणि फ्लाइट सेफ्टी हेडला पाठवली नोटिस

file photo

file photo

विमानात एक धक्कादायक प्रकार घडला होता.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 एप्रिल : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅम्पबेल विल्सन यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. 27 फेब्रुवारी रोजी दुबई-दिल्ली फ्लाइट दरम्यान कॉकपिटमध्ये पायलटच्या गर्लफ्रेंडच्या येण्याची आणि याबाबतची सूचना वेळवर न दिल्याने ही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचे सुरक्षा, संरक्षण आणि गुणवत्ता ऑपरेशन्सचे प्रमुख हेन्री डोनोहो यांनासुद्धा कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. विमान चालक दलातील एका सदस्याने डीजीसीएकडे तक्रार केली होती की, पायलटने त्याच्या गर्लफ्रेंडला कॉकपिटमध्ये प्रवेश दिला होता आणि क्रूने तिला कॉकपिटमध्येच पेय आणि अन्न दिले होते. डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, एअर इंडियाचे सीईओ आणि फ्लाइट सेफ्टी प्रमुख यांना 21 एप्रिल रोजीच या घटनेची वेळेवर माहिती न दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. उड्डाण करताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले. हेही वाचा - IPL 2023 : क्रिकेट स्टेडियम बनला कुस्तीचा आखाडा, दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्यात प्रेक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

याशिवाय या प्रकरणाच्या तपासातही विलंब होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सध्या एअर इंडियाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. सूत्रांनी सांगितले की, “ही घटना 27 फेब्रुवारी रोजी घडली होती आणि कॅम्पबेल आणि डोनोहो यांना 3 मार्च रोजी याची माहिती देण्यात आली होती. डीजीसीएने 21 एप्रिल रोजी पहिली चौकशी केली, तर एअर इंडियाने यापूर्वी अशी कोणतीही चौकशी केली नव्हती.

या महिन्याच्या सुरुवातीला, DCEA ने एअर इंडियाला तपास पूर्ण होईपर्यंत सर्व क्रू मेंबर्सना ड्युटी (रोस्टर) वरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. एअरलाइनने 21 एप्रिल रोजी सांगितले होते की, त्यांनी कथित घटना गांभीर्याने घेतली आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अनधिकृत लोकांना कॉकपिटमध्ये प्रवेश दिला जात नाही आणि जेव्हा असे होते तेव्हा ते नियमांचे उल्लंघन मानले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात