चंदीगड, 07 जून: पंजाबी गायक (Punjabi Singer) आणि काँग्रेस नेते (Congress Leader) सिद्धू मूसेवाला (Sidhu Musawala) हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुसेवाला हत्येचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे पुरावे समोर येत आहेत. हत्येत वापरण्यात आलेल्या अल्टो कारचे नवीन सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले आहे. घटनेच्या सुमारे 9 तासांनंतर, शूटर्स मोगा येथे अल्टो कारमध्ये पेट्रोल भरताना दिसले. त्यावेळी महामार्गावर कार सोडून ते पळून गेले होते. (Sidhu Moose Wala Murder Case CCTV Footage) सिद्धू मुसेवाला हत्याकांडात वापरण्यात आलेल्या अल्टो कारचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अनेक खुलासे होण्याची अपेक्षा आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मुसेवालाच्या हत्येनंतरच्या 9 तासांचे आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की, मानसापासून सुमारे 100 किमी अंतरावर एक अल्टो कार मोगाच्या पेट्रोल पंपावर सुमारे 3 वाजून 15 मिनिट 29 सेकंदांनी उभी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शूटर पेट्रोल भरताना दिसत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर जी कार उभी आहे तीच कार आहे ज्यातून गोळीबार करणारे पळून गेले होते. कारच्या पुढच्या सीटवर दोन लोक बसलेले दिसतात. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला शूटर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला हाताच्या इशाऱ्याने बोलवतो आणि पेट्रोल भरण्यासाठी पैसे देतो. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कारमध्ये 1500 रुपये किमतीचे पेट्रोल भरले होते. शूटर कार राष्ट्रीय महामार्गावर सोडून फरार झाले होते पेट्रोल पंपाचा कर्मचारी पैसे देऊन अल्टोमध्ये पेट्रोल भरतो, त्यानंतर शूटर गाडी घेऊन निघून जातात. गोळीबार करणारे सुमारे 2 मिनिटे पेट्रोल पंपावर थांबले मात्र पोलिसांना त्याची माहितीही नव्हती. पेट्रोल भरल्यानंतर शूटर्स पुढे जातात आणि यू-टर्न घेतात आणि नंतर हायवेवर निघून जातात. नंतर हे सर्व आरोपी कार धरमकोट राष्ट्रीय महामार्गावर सोडून पळून गेले. मुसेवाला यांच्या हत्येनंतर पोलिसांनी महामार्गावरून कार जप्त केली. 12 तासात दुसरं Encounter, सुरक्षा दलाला यश; दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान दुसरीकडे, सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीत विजय नावाचा एक व्यक्ती त्याला शस्त्रे पुरवत असे. ही व्यक्ती हरियाणाची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक विजय नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहे. विजय राजस्थानच्या जोधपूरमध्ये कुठेतरी लपला असण्याची भीती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.