नवी दिल्ली, 6 डिसेंबर: जंगलात फुलपाखरांचे फोटो काढत फिरण्याची हौस असलेल्या एका फोटोग्राफरनं (Brown Butterfly) त्याच्या कॅमेऱ्यात असं एक फुलपाखरू कैद केलं की प्रत्यक्षात तो इतिहासच घडला. भारतात अनेक प्रकारचे (New species) जीवजंतू आढळतात. फुलपाखरांच्या अनेक प्रजातींचा आतापर्यंत शोध लागला आहे. हा शोध घेण्यासाठी संशोधक वर्षानुवर्षं जंगलात (Research on butterflies) राहून त्यावर संशोधन करत राहतात. त्यांच्या जोडीला अनेक फोटोग्राफर्सही जंगलांमधून फिरत असतात, ज्यांनी काढलेले विविध प्रजातींचे फोटो हे शास्त्रज्ञांना अभ्यासात मदत करणारे ठरतात. सोनम वांगचुक नावाच्या एका फोटोग्राफरनं नुकताच एका चॉकलेटी फुलपाखराचा फोटो टिपला आहे.
सापडलं नवं फुलपाखरू
सोनम वांगचुक यांना 2016 सालापासूनच फोटोग्राफीची हौस आहे. ते वेगवेगळ्या प्रजातींचे फोटो काढून नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस या संस्थेला पाठवत असतात. त्यातील काही फोटो हे अभ्यासकांना अधिक माहितीसाठी पाठवून देण्यात येतात. मात्र नुकताच वांगचुक यांनी पाठवलेला चॉकलेटी फुलपाखराचा फोटो पाहून सर्वांनान आनंद झाला. फुलपाखराची ही प्रजाती यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती. या फोटोच्या निमित्तानं फुलपाखराच्या नव्या प्रजातीचा शोध लागला असून त्याचं श्रेय सोनम वांगचूक या फोटोग्राफरला देण्यात आलं आहे.
हे वाचा- सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, ओबीसींच्या आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती
वैज्ञानिकांनी केली खातरजमा
हा फोटो पाहिल्यानंतर NCBS च्या कृष्णमेघ कुंटे यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या प्रतिक्रियेत नव्या फुलपाखराचा शोध लागल्याचं जाहीर केलं आहे. भारतात आतापर्यंत अशा प्रकारचं फुलपाखरू आढळून आलं नव्हतं. पहिल्यांदाचा चॉकलेटी रंगाचं हे फुलपाखरू सापडलं असून ते चीनमधील फ्लिटर नावाच्या प्रजातीशी मिळतंजुळतं असल्याचं दिसून आलं आहे. या जातीच्या फुलपाखरांचे पंख चॉकलेटी रंगाचे असतात. या फुलपाखराच्या पंखांमध्येदेखील चॉकलेटी रंगाची छटा दिसून येत आहे. जुटाक्साच्या स्टडी जर्नलमध्येदेखील अशा प्रकारच्या फुलपाखरांचा उल्लेख आढळून आला आहे. मात्र भारतात पहिल्यांदाच या प्रकारचं फुलपाखरू आढळून आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Photography, Science