जाहिरात
मराठी बातम्या / देश / बेडरूममध्ये राधा कृष्णाचा फोटो लावल्यास विवाहबाह्य संबंध तयार होतात का?

बेडरूममध्ये राधा कृष्णाचा फोटो लावल्यास विवाहबाह्य संबंध तयार होतात का?

बेडरूममध्ये राधा कृष्णाचा फोटो लावल्यास विवाहबाह्य संबंध तयार होतात का?

वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाची मूर्ती न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामागचे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.

  • -MIN READ Local18 Delhi
  • Last Updated :

उद्धव कृष्ण (पाटणा), 07 मे : वास्तूशास्त्रानुसार चुकीच्या दिशेने ठेवलेली छोटीशी गोष्टही तुमचे जीवन अस्थिर आणि विस्कळीत करू शकते. वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाची मूर्ती न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामागचे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.

वास्तुशास्त्री सल्लागार केपी सिंह म्हणतात की, राधा-कृष्णाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पण बेडरूममध्ये लावल्याने वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होऊ शकतात. कारण बेडरूममध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवल्याने विवाहबाह्य संबंधांचीही शक्यता निर्माण होते.

जाहिरात
चुकूनही करू नका ही 7 कामे, दारिद्र्य दूर ठेवण्यासाठी फॉलो करा हे उपाय

त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ही मूर्ती घरातील बेडरूममध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, ही मूर्ती नवविवाहित जोडप्याला भेट म्हणून देऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण राधा-कृष्णाने कधीही लग्न केले नाही, ते फक्त काही काळ एकत्र राहिले.

वास्तू सल्लागार सांगतात की, जर तुम्हाला घरात राधा-कृष्णाची मूर्ती किंवा चित्र लावायचे असेल तर तुम्ही हेही लक्षात ठेवावे की तुम्ही लावत असलेल्या चित्रात फक्त राधा-कृष्णाचेच असावे त्यात गोपीकिशन नको. तसेच राधा-कृष्णाचा बालपणीचा फोटो लावत असाल तर ते चित्र तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता.

करा गुलाबाचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

वास्तु सल्लागार केपी सिंह यांच्या मते, राधा-कृष्णाच्या मूर्ती किंवा चित्राऐवजी, जर तुम्ही तुमच्या मास्टर बेडरूमच्या नैऋत्य दिशेला तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे छान आणि सुंदर चित्र लावले तर त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर सकारात्मक परिणाम होईल असे ते म्हणाले

टीप : न्यूज 18 लोकल या बातमीची पुष्टी करत नाही.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात