• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Corona रुग्णांना काहीसा दिलासा, देशात औषध कंपन्यांनी Remdesivir इंजेक्शनचे उत्पादन वाढवले

Corona रुग्णांना काहीसा दिलासा, देशात औषध कंपन्यांनी Remdesivir इंजेक्शनचे उत्पादन वाढवले

Remdesivir चा गेल्या काही दिवसांपासून तुटवडा जाणवत होता. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी फिरूनही हे औषध मिळत नव्हते. मात्र, आता औषध कंपन्यांनी याचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 एप्रिल: देशात कोरोनाबाधित (Corona in India) रुग्णांचा वाढता आकडा थक्क करणारा असतानाच कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिविर औषधाचा (Remdesivir Injection) गेल्या काही दिवसांपासून तुटवडा जाणवत होता. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी फिरूनही हे औषध मिळत नव्हते. मात्र, आता औषध कंपन्यांनी याचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या रविवारी भारत सरकारने या औषधाचा देशात तुटवडा असल्याने त्याच्या निर्यातीवरही बंदी घातली होती. या औषधच्या तुटवड्याविरोधात आज पुण्यातही आंदोलन सुरू आहे. रेमडिसिव्हीरबाबत अशी परिस्थिती असताना एक दिलासादायक बातमी समोर येते आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिव्हीर औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, याचा विचार करून नवीन तीन ते चार प्लांटमध्ये औषधाचे उत्पादन सुरू आहे. वाढती मागणी लक्षात घेता पाच ते सहा लाख असणारे उत्पादन आता महिन्याला दहा ते बारा लाख डोसेसपर्यंत वाढवण्यात आले आहे. याहून अधिक म्हणजे वीस लाख प्रति महिना हे आमचे पुढील उत्पादन लक्ष्य असणार आहे. त्यामुळे काही दिवसातच या औषधाचा पुरवठा सुरळीत होईल, असे 'जायडस कॅडीला'च्या (Zydus Cadila) प्रवक्त्यांनी सांगितले. (हे वाचा-Remdesivir च्या तुटवड्यामुळे पुणेकर संतप्त, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या) येत्या काही आठवड्यात परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा भारतात अधिकाधिक रुग्णांपर्यंत हे औषध पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळेकडून (Dr. Reddy's Laboratory) सांगण्यात आले आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही उत्पादन वाढवत आहोत. आम्ही बाजारात रेमडेसिव्हीर लवकरात-लवकर आणत आहोत, त्यामुळे त्याचा वेगात पुरवठा केला जावू शकतो. आम्ही एमआरपी देखील 50 टक्क्यांनी कमी केली आहे, जेणेकरून सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना माफक दरात औषध उपलब्ध व्हावे. येत्या काही दिवसात पुरवठा सुरळीत होईल.' सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (Sun Pharmaceutical Industries) या औषधी कंपनीने म्हटले आहे की, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 'सिन्जेन'शी करार करून रेमेडिसिव्हीर उत्पादनाची क्षमता वाढवत आहे. सन फार्माच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'कंपनीने आधीच उत्पादन वाढविले आहे आणि सध्या दोन प्लांट्सवर हे औषध तयार करीत आहे. उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने आणखी एका ठिकाणी औषधाचे उत्पादन घेण्याचे ठरले आहे.' (हे वाचा-भारतात होणार नाही कोरोना लशीचा तुटवडा; Sputnik V चे महिन्याला 5 कोटी डोस) औषध निर्माता कंपनी सिप्ला (Cipla) ने म्हटले आहे, "मागील संसर्गाच्या तुलनेत आम्ही यावेळी रेमेडिसिविरच्या उत्पादनात लक्षणीय सुधारणा केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार,  मागील वेळेच्या तुलनेत यावेळी उत्पादन दुप्पट केले आहे. औषधाची अनपेक्षित मागणी लक्षात घेता आम्ही आमच्या नेटवर्कद्वारे अधिक प्रयत्न करत आहोत."
  Published by:News18 Desk
  First published: