मराठी बातम्या /बातम्या /देश /

petrol diesel price : मोदी सरकारकडून दिवाळी भेट, पेट्रोल 5 तर डिझेलवर 10 रुपये उत्पादन शुल्क कपात

petrol diesel price : मोदी सरकारकडून दिवाळी भेट, पेट्रोल 5 तर डिझेलवर 10 रुपये उत्पादन शुल्क कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पण आता ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे

  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price) दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पण आता ऐन दिवाळीच्या (diwali) मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने (modi government) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे.  (Modi governments  reduction of excise duty on petrol diesel price)

मोदी सरकारकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर अखेरीस जनतेला दिलासा देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं होतं. पण, आता उत्पादन शुल्क कर कमी कऱण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे.

Diwali 2021 मध्ये तुमच्या नातलगांना गिफ्ट म्हणून द्याल 'आर्थिक सुरक्षा'

डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवला आहे आणि आगामी रब्बी हंगामात डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केल्याने शेती कामांना चालना मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशांतर्गत किमतींमध्ये वाढ झाली. पेट्रोलच्या दराने 110 चा आकडा पार केला तर डिझेलचे दरही 100 च्या पुढे गेले.

Dengue Fever: डेंग्यूचा ताप कसा ओळखायचा? 3 प्रकारचा असतो आजार

विरोधकांनी वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विरोधकांनी देशभरात आंदोलन पुकारले होते. ठिकठिकाणी इंधन दरवाढीवर आंदोलन करण्यात आली. अखेरीस मोदी सरकारने दरवाढीवर तोडगा काढत उत्पादन शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोल 5 रुपये आणि डिझेलच्या  दरात 10 रुपये कपात करण्यात आली आहे.

तसंच, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यांनाही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट समान प्रमाणात कमी करण्याचे आवाहन सुद्धा मोदी सरकारने केले आहे.

First published: