Home /News /national /

होय 'हे' खरं आहे! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल झालं महाग

होय 'हे' खरं आहे! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल झालं महाग

18 दिवसांत पेट्रोल साधारण 8.50 रुपयांची तर डिझेल 10.25 रुपयांनी महाग झालं आहे.

    नवी दिल्ली, 24 जून : कोरोना व्हायरसच्या महासंकटात आतापर्यंत पेट्रोलचे दर सतत वाढत असल्यानं खिशाला कात्री लागली होती मात्र पहिल्यांदा पेट्रोलपेक्षा डिझेल जास्त महाग झालं आहे. 18 व्या दिवशी पेट्रोलचे दर स्थिर असून डिझेलची किंमत वाढली आहे. बुधवारी डिझेल 48 पैशांनी वाढलं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत डिझेल प्रति लिटर 79.40 रुपये तर पेट्रोल 79.76 रुपये आहे. पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. कोलकातामध्ये पेट्रोल 81.45 तर डिझेल 74.63 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 86.54 रुपये तर डिझेल 71.58 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नई इथे पेट्रोलची किंमत 83.04 तर डिझेलची किंमत 76.77 रुपये आहे. 18 दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत साधारण 8.50 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर, गेल्या 18 दिवसांत डिझेल 10.25 रुपयांनी महाग झालं आहे. हे वाचा- Mutual Funds मध्ये गुंतवणूक केल्यास 15 वर्षात मिळतील 2 कोटी? वाचा सविस्तर पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता. देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Diesel hike, Diesel petrol price in mumbai, Diesel prices, Petrol, Petrol and diesel, Petrol- diesel price

    पुढील बातम्या