जाहिरात
मराठी बातम्या / देश / रस्त्यावर नवीन ट्रॅफिक चिन्ह पाहून लोक कन्फुज; व्हायरल होत असलेल्या चिन्हाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

रस्त्यावर नवीन ट्रॅफिक चिन्ह पाहून लोक कन्फुज; व्हायरल होत असलेल्या चिन्हाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

रस्त्यावर नवीन ट्रॅफिक चिन्ह पाहून लोक कन्फुज; व्हायरल होत असलेल्या चिन्हाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

बंगळुरू वाहतूक पोलिसांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी वाहतूक नियमांशी निगडीत चिन्हांचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    बंगळुरु, 3 ऑगस्ट : सुरक्षेसाठी प्रत्येक वाहन चालकानं वाहतुकीच्या नियमांचे (Traffic Rules) पालन करणं बंधनकारक असतं. अनेकदा हे नियम मोडल्यानं वाहतूक पोलीस (Traffic police) संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करताना दिसतात. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशिष्ट नियम दर्शवणारी चिन्ह (Traffic Signs) रस्त्यावर लावलेली असतात. नियमांशी संबंधित चिन्हाविषयी वाहनचालकांना (Drivers) पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. पण काही वेळा या चिन्हांचा नेमका अर्थ न समजल्याने वाहनचालकाकडून नकळतपणे नियमांचं उल्लंघन होतं. याच अनुषंगानं सध्या बंगळुरू वाहतूक पोलिसांची (Bengaluru Traffic Police) एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) विशेष चर्चेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी वाहतूक नियमांशी निगडीत चिन्हांचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या या प्रयत्नाला नेटिझन्स आणि नागरिकांनी विशेष दाद दिली आहे. या संदर्भातलं वृत्त `लाइव्ह मिंट`ने दिलं आहे. वाहतुकीच्या नियमांशी निगडीत सर्व चिन्हांचा अर्थ प्रत्येकाला माहिती असतोच असं नाही. वाहनचालकांना तसंच नागरिकांना या चिन्हाविषयी माहिती व्हावी, त्यांच्या मनातल्या शंका, संभ्रम दूर व्हावा, या उद्देशानं बंगळुरु वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. एका ट्विटर युजरच्या निर्देशनास वाहतुकीच्या नियमाविषयीचं एक चिन्हं आलं. त्याने त्या चिन्हाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. या चिन्हासंबंधी शंका दूर करावी, अशी विनंती करत या युजरनं पोलीस ट्विटर हॅंडलला (Twitter Handle) टॅग केलं. या युजरच्या ट्वीटला बंगळुरू वाहतूक पोलिसांना तातडीनं प्रतिसाद दिला. या ट्वीटवर अनेक युजर्सनं कमेंट (Comment) करत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनं कमेंट केल्या आहेत. ``वाहतुकीच्या नियमांशी निगडीत सर्व चिन्हांचा अर्थ वाहनचालकांना माहिती असतो, असं नाही. त्यामुळे पोलिसांनी केलेलं मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त आहे,`` असा सूर नेटिझन्समधून व्यक्त झाला आहे. शिंदे गटाविरोधात आता तिसरी लढाई, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले 3 आदेश

    जाहिरात

    अनिरुद्ध मुखर्जी नावाच्या एका ट्विटर हॅंडलवरून पांढऱ्या रंगाची पार्श्वभूमी असलेल्या चार काळ्या ठिपक्यांचं चिन्हं असलेल्या पाटीचा फोटो शेअर करण्यात आला. हे चिन्ह नेमकं कोणता नियम दर्शवतं, असा प्रश्न या युजरनं @wftrps,@blrcitytraffic या वाहतूक पोलिसांच्या ट्विटर हॅंडलला टॅग करत ट्विट केला. त्यावर बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी प्रतिसाद दिला. या संदर्भात पोलिसांनी लिहिलं की ``हा एक सावधगिरीची सूचना देणारा फलक आहे. एखादी अंध व्यक्ती (Blind Person) रस्त्यावर असू शकते. त्यामुळे तुम्ही वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. होप फार्म जंक्शन येथे एक अंध मुलांची शाळा आहे. तिथं हा बोर्ड लावण्यात आला आहे.`` Adinath Kothare: बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या सिरीजमध्ये झळकणार दौलतराव पोलिसांच्या या पोस्टवर युजर्सनं कमेंट्स करत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ``तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद, मला या चिन्हाचा अर्थ माहिती नव्हता,`` असं एका युजरनं कमेंट करत म्हटलं आहे.`` @blrcitytrafficने ट्विटरवर रोज वाहतुकीच्या नियमांवर आणि त्याच्याशी संबंधित चिन्हांवर थोडा प्रकाश टाकणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. यामुळे आम्हाला याबाबत सखोल माहिती मिळेल,`` असं दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे. ``मला या विषयी माहिती नव्हती. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,`` असं एका युजरनं कमेंट करताना म्हटलं आहे. ``वाहतुकीशी संबंधित काही चिन्हांचा अर्थ आम्हाला माहिती नव्हता. पोलिसांनी त्याविषयी सविस्तर माहिती दिल्याने, आम्हाला चिन्हाचा अर्थ समजला,`` असं युजर म्हणतात. पोलिसांच्या या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत केलं असून, वाहतुकीच्या नियमांविषयी आम्हाला पोलिसांनी सातत्यानं मार्गदर्शन करावं, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात