Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

संध्याकाळ होताच 'या' गावात सर्वांना टाकलं जातं तुरुंगात; वृद्ध, महिला, लहान मुलांनाही सोडत नाहीत कारण...

संध्याकाळ होताच 'या' गावात सर्वांना टाकलं जातं तुरुंगात; वृद्ध, महिला, लहान मुलांनाही सोडत नाहीत कारण...

संध्याकाळ होताच शेकडो ग्रामस्थांना ग्रामीण भागातील जेलमध्ये बंद केलं जातं.

संध्याकाळ होताच शेकडो ग्रामस्थांना ग्रामीण भागातील जेलमध्ये बंद केलं जातं.

संध्याकाळ होताच शेकडो ग्रामस्थांना ग्रामीण भागातील जेलमध्ये बंद केलं जातं.

रायपूर (छत्तीसगड), 16 जून : सामान्यपणे जेल म्हणजे तुरुंग जिथं गुन्हेगार असतात. आरोपींना शिक्षा म्हणून इथं बंदिस्त केलं जातं. पण काही गावांत मात्र गुन्हेगार नव्हे तर ज्यांनी काहीही अपराध, गुन्हा केला नाही अशा सामान्य व्यक्तींनाही चक्क तुरुंगात टाकलं जातं. संध्याकाळ होतात, या गावातील ग्रामस्थांना जेलमध्ये बंद केलं जातं (All Villagers in jail after evening). अगदी वयस्कर व्यक्ती, महिला, तरुण आणि लहान मुलांनाही सोडलं जात नाही. हे गावं नेमकं आहे तरी कोणतं आणि इथं असं का केलं जातं हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल.

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कांकेर (Kanker) जिल्ह्यातील भानुप्रतापपुर परिसरातील ही गावं. या गावांतील ग्रामस्थांना (Rural People) हत्तींपासून (Elephant) बचावाकरिता तुरुंगात राहावं लागत आहे. दंडकारण्यातील घनदाट जंगलातील भानुप्रतापपुर भागातील अनेक गावांमधील शेकडो आदिवासींना रात्रीच्या वेळी हत्तींपासून आपला जीव वाचवण्यासाठी जेलमध्ये (Jail) लपून राहावं लागत आहे. 20 पेक्षा जास्त हत्ती दिवसा जंगलातील डोंगराळ भागात झोपून राहतात आणि रात्रीच्या वेळी जंगलानजीकच्या गावांमध्ये फिरून खळबळ माजवत आहेत.

मागील एका महिन्यात या हत्तींनी छत्तीसगडमधील महासमुंद आणि जशपूरमधील 3 जणांना चिरडून मारलं आहे. त्यामुळे भीती निर्माण झाली असून, रोज संध्याकाळ होताच शेकडो ग्रामस्थ ग्रामीण भागातील जेलमध्ये आसरा घेत आहेत. या जेलमध्ये ते रोज कैद्याप्रमाणे राहून रात्र काढत असून सकाळ होताच घराकडे परतत आहेत. याबाबत गावातील महिला बिजीकट्टा यांनी सांगितले की, आम्हाला यापूर्वी कधीही अशा परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. हत्तींच्या दहशतीमुळे आम्ही 4 वाजताच जेवण तयार करून मुलांसह जेलमध्ये आसरा घेतो. तिथं कैद्यांप्रमाणे रात्र काढतो आणि सकाळी परत शेतीकामांसाठी परततो.

हे वाचा - व्हॅलेंटाईनला प्रपोज अन् मंदिरात सर्वांसमोर लग्न,संजय-शिवलक्ष्मीची प्रेमकहाणी

सकलू या ग्रामस्थाने सांगितलं की हत्तींच्या दहशतीमुळे (Terror Of Elephants) आम्हाला दररोज रात्रीच्या वेळी कैद्यांप्रमाणे तुरुंगात राहावं लागतं. अशी दहशत आम्ही यापूर्वी कधीही अनुभवलेली नाही, त्यामुळे अधिक भीती वाटते. दुपारी 2-3 वाजल्यानंतर जेलमध्ये यावं लागतं. ग्रामीण भागातील रहिवासी आणि हत्ती यांच्या संघर्षाविषयी सरकारने सांगितले की सरकार या रहिवाश्यांच्या सुरक्षेबाबत कटिबध्द आहे. हा हत्तींच्या भ्रमंतीचा परिसर आहे. मागील वर्षी देखील या भागात हत्तींचे वास्तव्य होते. त्यानंतर ते या भागातून निघून गेले होतं.

मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chief Minister Bhupesh Baghel) यांनी सांगितलं, की रायगड कोरबामार्गे बारनवापरा जंगलातून हत्ती इथपर्यंत पोहोचले आहेत. आता त्यांचं वास्तव्य कांकेरमध्ये आहे. मागील वर्षी देखील हत्तींनी या भागातच वास्तव्य केलं होतं. हे हत्ती येथूनच मागे फिरतात. छत्तीसगडमध्ये हत्ती आणि माणूस यांचा संघर्ष खूप जुना आहे. इथं मागील 5 वर्षांत 350 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हत्तींसोबतच्या संघर्षामुळे झाला आहे. तसेच 25 पेक्षा जास्त लोक यामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. छत्तीसगडमधील माणूस आणि हत्तींमधील संघर्ष रोखण्यासाठी 2000 चौरस किलोमीटर क्षेत्रात हत्तींसाठी लेमरु रिझर्व्ह एलिफंट फ्रंट प्रस्तावित आहे. मात्र सरकार यामध्ये केवळ भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत.

हे वाचा - SBI Alert! या दोन तासांत उद्या इंटरनेट बँकिंगसह या सुविधा बंद राहणार

भाजपचे माजी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी सांगितले की सरकारला माणूस आणि हत्ती यांच्या संघर्षाशी काही देणंघेणं नाही. यात केवळ भ्रष्टाचार (Corruption) होत आहे. या सरकारने अडीच वर्षात काहीही केलं नाही.

First published:

Tags: Chhattisgarh, Elephant, Raipur news