जाहिरात
मराठी बातम्या / देश / Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांना अटक, जामीन मंजूर, काय आहे प्रकरण?

Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांना अटक, जामीन मंजूर, काय आहे प्रकरण?

Vijay Shekhar Sharma, founder and CEO of Paytm

Vijay Shekhar Sharma, founder and CEO of Paytm

पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma, founder and CEO of Paytm)यांना गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती आणि IPC कलम 279 निष्काळजीपणे वाहन चालवणे अंतर्गत आरोप ठेवल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मार्च: पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma, founder and CEO of Paytm)यांना गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका(Paytm CEO Arrest) करण्यात आली. अशी माहिती समोर आली आहे. शेखर शर्मा यांना बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली. डीसीपी ड्रायव्हर दीपक कुमार यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या कारला दिल्लीतील मालवीय नगर भागात मदर इंटरनॅशनल स्कूलजवळ अपघात झाला. विजय शेखर शर्मा यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्याच्या कारला जग्वार लँड रोव्हर गाडीने धडक दिली.

जाहिरात

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर विजय शेखर शर्मा आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पळून गेले. जग्वार लँड रोव्हर ज्या वाहनाला धडकले ते दक्षिण दिल्लीच्या डीसीपीचे वाहन होते. जे पेट्रोल भरण्यासाठी चालक सोबत घेऊन जात होता. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची चौकशी केली असता हे वाहन ग्रेटर कैलास पार्ट 2 येथील रहिवासी विजय शेखर शर्मा चालवत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी विजय शेखर शर्माला अटक केली. मात्र, त्यांची जामीनपात्रावर तात्काळ सुटका करण्यात आली. कोण आहे विजय शेखर शर्मा?  मोबाइल वॉलेट पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा 39 वर्षीय असून हे तरुण भारतीय अब्जाधीश आहेत. फोर्ब्सने 2018 च्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत शर्मा यांना $1.7 अब्ज संपत्तीसह 1394 व्या स्थानावर ठेवले आहे. शर्मा हे 40 वर्षांखालील एकमेव भारतीय अब्जाधीश आहेत. विजय शर्मा यांनी 2011 मध्ये मोबाईल वॉलेट पेटीएमची स्थापना केली. यासोबतच ई-कॉमर्स व्यवसाय पेटीएम मॉल आणि पेटीएम पेमेंट्स बँक देखील तयार करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात