जाहिरात
मराठी बातम्या / देश / रेल्वे स्टेशन मास्टरची विकृती, कोरोना झाला म्हणून पत्नीची हत्या करून स्वत:लाही संपवलं

रेल्वे स्टेशन मास्टरची विकृती, कोरोना झाला म्हणून पत्नीची हत्या करून स्वत:लाही संपवलं

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

या घटनेतील पत्नीच्या हत्येमागील कारण धक्कादायक आहे. पत्नीला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली होती, यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना अंगावर काटा आणणारी आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटणा, 27 एप्रिल : बिहारमधील पाटणा (Patna Bihar news) येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका रेल्वे स्टेशन मास्टरने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. पत्नीच्या हत्येमागील कारण पाहून सर्वांनाचा धक्का बसला. त्यांच्या पत्नीला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली होती, यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पतीने अपार्टमेंटच्या चार मजली इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पाटण्यातील पत्रकारनगर पोलीस ठाणे परिसरातील ओम रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये ही घटना आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी पत्रकारनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यापासून तो तणावात होता. पत्नी पॉझिटीव्ह असल्याच्या रागातून त्याने ही घटना घडवून आणली. संबंधित पती अतुल लाल हे पाटणा जंक्शन रेल्वेमध्ये काम करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कुमार यांनी सांगितले. हे वाचा -  BREAKING : रश्मी शुक्लांना फोन टॅप प्रकरण भोवणार, पोलिसांनी बोलावले चौकशीला! स्टेशन मास्टरच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारणावरूनच दोघांमध्ये भांडण झाले. संतप्त झालेल्या पती अतुल लाल यांनी पत्नी तुलिकाचा गळा आवळून खून केला. यानंतर अतुल लालनेही आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्याचाही मृत्यूही झाला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. हे वाचा -  पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या बंगल्यात 16 लाखांची जबरी चोरी; चोरट्यांनी चाकूच्या धाकाने लुटलं दरम्यान, महाराष्ट्रामध्ये (Maharashtra corona update) सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात दररोज 60 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळत असतात. मात्र, सोमवारी 48 हजार 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, रविवारी मृतांचा आकडा 800 हून अधिक असतानाच सोमवारी मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबईमध्येही (Mumbai Corona News) मागील चोवीस तासात 3,876 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील आकडा कमी झाल्यानं देशातील एकूण रुग्णसंख्याही कमी नोंदली गेली. महाराष्ट्रात काही प्रमाणात दिलासा मिळालेला असतानाच दिल्लीमध्ये मात्र कोरोनाचा प्रकोर सुरूच आहे. राजधानीमध्ये सोमवारी कोरोनामुळे रेकॉर्ड 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात नोंदवला गेलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. सोमवारी दिल्लीमध्ये 20 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात