पाटणा, 7 जुलै: पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न (Marriage) करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्याची कल्पना असून ही काही जण हे उद्योग करत असतात. दुसऱ्या लग्नाचं बिंग फुटू नये म्हणून त्यांच्याकडून खबरदारी देखील घेतली जाते, पण अखेर कधी तरी ते बिंग फुटतं. एक उद्योगपती (businessman) देखील पत्नी आणि मुलीला सोडून गुपचूप दुसरं लग्न करत होता. त्याचं हे बिंग लग्नाच्या मांडवातच बिंग फुटलं.
काय आहे प्रकरण?
बिहारची राजधानी पाटणा (Patana, Bihar) मधील हा प्रकार आहे. पाटणामधील बडे व्यापारी सिद्धार्थ सिंह यांच्या लग्नाच्या मांडवात हा सर्व गोंधळ झाला. सिद्धार्थ सिंह असे या उद्योगपतीचे नाव आहे. ते पहिली पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलीला सोडून देऊन दुसरं लग्न करत होते. त्यावेळी त्यांची पहिली पत्नी लग्नाच्या ठिकाणी आली आणि तिने पतीला रंगेहाथ पकडले.
यावेळी पत्नीनं सिद्धार्थ सिंह यांची भर मांडवात हजेरी घेतली. अचानक घडलेल्या या प्रसांगामुळे लग्नाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला तसेच सिंह यांची चांगलीच बदनामी झाली. नम्रता सिंह असं या पीडित पत्नीचे नाव आहे. त्यांनी यावेळी त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीचा हवाला देत आपल्याला न्याय देण्याची मागणी केली. यावेळी जाप पार्टीचे नेता देखील नम्रता यांच्याबरोबर उपस्थित होते. पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आपण इथे आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
धक्कादायक! 13 वर्षीय मुलीनं बाळाला दिला जन्म; वर्गमित्रानं ब्लॅकमेल करत केला होता बलात्कार
पतीनं केली फसवणूक
नम्रता सिंह यांनी यावेळी मीडियाला सांगितले की, 'सिद्धर्थ सिंह यांनी आपली फसवणूक केली आहे. त्यांनी घटस्फोटाचे कागद आंधारत ठेवून त्यावर आपली स्वाक्षरी घेतली. त्यानंतर ते गुपचूप दुसरे लग्न करत होते. त्याची माहिती समजल्यानंतर आपण इथे आलो आहोत.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.