जाहिरात
मराठी बातम्या / देश / औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू तर दुसरीकडे काळ्याबाजाराला ऊत, बड्या व्यावसायिकासह सेलिब्रिटींचा शोध सुरू

औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू तर दुसरीकडे काळ्याबाजाराला ऊत, बड्या व्यावसायिकासह सेलिब्रिटींचा शोध सुरू

औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू तर दुसरीकडे काळ्याबाजाराला ऊत, बड्या व्यावसायिकासह सेलिब्रिटींचा शोध सुरू

धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये बड्या व्यावसायिकासह काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 मे : दिल्लीमध्ये ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, (Delhi Oxygen Concentrator Racket) आणि कोरोनाशी संबंधित महत्त्वपूर्ण जीवन रक्षक औषधं, अन्य आवश्यक मेडिकल उपकरणांमध्ये काळा बाजार प्रकरणात दररोज नवनवा खुलासा होत आहे.  साउथ दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून 419 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर जप्त केल्यानंतर शुक्रवारीदेखील खान मार्केटमधील (Khan Market) प्रसिद्ध खान चाचा रेस्टॉरंटमधून 96 आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी सकाळी खान मार्केटमधील अन्य दुकानातून 9 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पोलिसांच्या छापेमारीत 524 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सापडले आहेत. एकीकडे दिल्लीत ऑक्सिजन आणि औषधांअभावी लोकांचा मृत्यू होत आहे. तर दुसरीकडे लोक जीवन रक्षक औषधांचा काळाबाजार करीत असल्याचं दिसत आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये एक बडे व्यावसायिक आणि एक अन्य पेज-3 सेलिब्रिटी सामील असल्याचे पुरावे समोर आले आहे. या दोघांना लवकरच चौकशीसाठी बोलाविण्यात येऊ शकते. पोलिसांनी दिल्लीच्या ग्रेटर कैलाश भागातील काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हे दोघे जीवन रक्षक उपकरणांचा काळाबाजार करीत ते जास्त किंमतीत विकत होते. हे ही वाचा- लस आहे पण लसीकरण मोहीम ठप्प! मुंबई मनपा आयुक्तांच्या निर्णयाचा असाही परिणाम काय काय केलं जप्त? ग्रेटर कैलासकडून पोलिसांना 10 मेडिकल ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, 3486 डिजिटल थर्मामीटर ,265 डिजिटल गन थर्मामीटर , 684 ऑक्सीमीटर ताब्यात घेण्यात आले आहे. ग्रेटर कैलास पोलीस ठाण्याचे एसएचओ रितेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, कोरोनाशी संबंधित औषधे आणि उपकरणे जास्त किंमतीत विकले जात आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री 9 वाजता ग्रेटर कैलाशच्या एम ब्लॉक मार्केटमधून या आरोपींना अटक केली, या आरोपींपैकी एकाचं नाव सइद असून हा दिल्ली जामिया नगर येथे राहणारा आहे. सातत्याने सापडत असलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरशी जोडलेल्या प्रकरणात पोलिसांना नवनीत कालरा नावाच्या एका मोठ्या व्यावसायिकाचा शोध घेत आहे. याशिवाय एक सेलिब्रिटीच्या नावाचा देखील समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी साऊथ दिल्लीतील रेस्टॉरंट बारमधून 419 ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर जप्त करण्यात आले होते. या रेस्टॉरंटचे मॅनेजर हितेश यांच्या सांगण्यानुसार खान मार्केटमधून ऑक्सिजन कॉन्सट्रेटरदेखील ताब्यात घेण्यात आले. हितेशने बडे व्यावसायिक आणि सेलिब्रिटीशीही संबधित अनेक गोष्टी पोलिसांना सांगितल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात