सिंगरौली, 23 जून : येथील जिल्ह्यात 4 लहान मुलांचा जीव धोक्यात आला होता. तब्बल 5 तासांपर्यंत मुलं आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. ही मुलं नदीच्या मधोमध अडकले होते. नदीत पाणी वाढत होतं आणि गावातील लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. अखेर जिल्हा प्रशासनाने बचाव अभियान राबवून मुलांची सुटका केली. आता ते त्यांच्या पालकांसमवेत आहे आणि रेस्क्यू टीमचे आभार मानत आहेत. सिंगरौली जिल्ह्यातील जराहा गावची मुले पावसात मौजमजा करण्यासाठी नदीवर गेली होती. तिथं मुले मयार नदीवर मासेमारी करण्यासाठी उतरली. या चौघांच वय 4 ते 10 वर्षांच्या दरम्यान आहेत. ते मासेमारीमध्ये इतके मग्न झाले की त्यांना नदीत वादळ दिसून शकलं नाही. काही क्षणात त्यांना पाण्याने वेढले. पावसामुळे नदीतील पाणी वाढत होतं. अशा परिस्थितीत मुलांना बाहेर काढणं अशक्य होतं. त्यांना पाण्यात अडकलेले पाहून ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. पण नदीचा प्रवाह इतका वेगात होता की ते मुलांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
**प्रत्येक क्षण जीवघेणा हे वाचा-** लष्कर प्रमुखांनी जखमी जवानांची घेतली भेट; पुढील ऑपरेशनचा घेणार आढावा गावकरी त्यांना वाचवू शकत नव्हते, त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली. जिल्हा प्रशासनाची टीम एसडीआरएफच्या पथकासह घटनास्थळी पोहोचली आणि मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मुले सुमारे 5 तास पाण्यात अडकून होती. पाण्याचा वेग इतका होता की एसडीआरएफच्या चमूने त्यांना काढण्यासाठी सुमारे 2 तासांचा वेळही घेतला. अखेर प्रत्येकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले.