Home /News /crime /

5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी

5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी

कर्नाटकातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका हिंदू तरुणाची आंतरधर्मीय प्रेम संबंधातून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर धारमधून एका तरुणीला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

  भोपाळ, 27 मे : तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाने धर्मपरिवर्तनासाठी जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) धार येथून समोर आला आहे. या आरोपीने तरुणीला आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. आणि त्याच्यासोबत निकाह करण्याची जबरदस्ती केली. यानंतर पीडितेने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात धार्मिक स्वतंत्रता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  कर्नाटकातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका हिंदू तरुणाची आंतरधर्मीय  प्रेम संबंधातून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर धारमधून एका तरुणीला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

  शेजारील तरुण घेऊन गेला होता मांडव.. 18 वर्षांच्या तरुणीने पोलिसांना सांगितलं की, आरोपी सोहेलसोबत बोलणं झालं तेव्हा आरोपीने काही आक्षेपार्ह फोटो घेतले होते. जे व्हायरल करण्याची धमकी देत होता. आरोपीने 8 फेब्रुवारीपासून तिला त्रास द्यायला सुरू केली. दोन दिवसांपूर्वी 24 फेब्रुवारी रोजी आरोपी सोहेल पीडितेला धमकी देऊन बाईकवरुन सागोरहून मांडवला घेऊन गेला. येथे लव जिहादचा संशय व्यक्त करीत हिंदू संघटनेने आरोपीला पोलिसांकडे सोपवलं. या प्रकरणात मांडव पोलीस तपास करीत असून पीडितेच्या कुटुंबीयांना बोलवण्यात आलं.

  पोलिसांनी गुन्हा केला दाखल... पीडितेने घटनाक्रमाची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर पोलिसांना एक आवेदन देण्यात आलं. यात तरुणीने आरोपीद्वारा धर्म परिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती केल्याचं सांगितलं. याचा तपास करीत असताना आरोपी सोहेलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  आंतरधर्मीय संबंधातून तरुणाची हत्या कर्नाटकातील (Karnataka) कलबुर्गी जिल्ह्यात (Kalburgi district) एका हिंदू व्यक्तीची (Hindu man) हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलीय. या कारवाई दरम्यान पोलिसांकडून 19 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री 25 वर्षीय विजया कांबळे (Vijaya Kamble) याच्यावर वार करून लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. गेल्या वर्षभरात आंतरधर्मीय संबंधांवरून हत्येची ही तिसरी घटना आहे. विजय याचं एका वेगळ्या धर्माच्या मुलीवर प्रेम होते. यातूनच त्याची हत्या करण्यात आली.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime, Religion

  पुढील बातम्या