मुनीश सैनी असे या युवकाचे नाव असून त्यानं आपल्या नवपरिणित पत्नीला चक्क हेलिकॉप्टरमधून घरी नेलं. या तामझामवाल्या वरातीची चर्चा पंचक्रोशीत अजून सुरू आहे.
मुनीश सैनी पानीपतचा रहिवासी आहे. मुनशीने जींदच्या नरवाना येथील रहिवासी मोनिकाशी लग्न केलं आणि तिला आपल्या घरी म्हणजे पानिपतला हेलिकॉप्टरमधून आणलं.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, मुनीशने या लग्नासाठी हुंडाही नाही घेतला. मुनीश सैनी यांचे वडील माजी नगरसेवक रामकुमार सैनी आहेत. त्यांना तीन मुलं व एक मुलगी आहे. पहिल्या दोन मुलांच्या लग्नातही त्यांनी हुंडा घेतला नाही किंवा आपल्या मुलीच्या लग्नातही हुंडा दिला नाही, असं ते आवर्जून सांगतात.
माझ्या पत्नीचं म्हणजे मुनीशच्या आईचं स्वप्न होतं की तिचा धाकटा मुलगा हेलिकॉप्टर मधून तिच्या सुनेला घरी घेऊन यावा. ते स्वप्न मुनीशने पूर्ण केलं.
आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुनीशने दिल्लीतील कंपनीशी संपर्क साधला आणि हेलिकॉप्टर बुक केलं. वधूला हेलिकॉप्टरने आणण्याचा निर्णय घेतला. सेक्टर 24 मध्ये बांधलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर पाहण्यासाठी शेकडो लोक जमा झाले होते.
यासोबतच सैनी कुटुंबीयांनी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेला बळकटी देताना हुंडा न घेता लग्नात फक्त एक रुपया घेऊन समाजात एक आदर्श ठेवला आहे, जेणेकरून कोणीही आपल्या मुलींना ओझे मानणार नाही. या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.