Home /News /national /

भारत-पाकिस्तान सीमेवर महिलेची प्रसूती; बाळाला दिलं खास नाव

भारत-पाकिस्तान सीमेवर महिलेची प्रसूती; बाळाला दिलं खास नाव

पाकिस्तानातील एका जोडप्याने आपल्या नवीन जन्मलेल्या मुलाचं नाव 'बॉर्डर' असं ठेवलं आहे. ते गेल्या 71 दिवसांपासून अटारी सीमेवर इतर 97 पाकिस्तानी नागरिकांसह अडकून पडले आहेत

    नवी दिल्ली 06 डिसेंबर : 2 डिसेंबर 2021 रोजी एक नवीन इंडो-पाक बॉर्डर (Indo-Pak Border) माणसाच्या रूपात अस्तित्वात आली. पाकिस्तानातील एका जोडप्याने आपल्या नवीन जन्मलेल्या मुलाचं नाव 'बॉर्डर' असं ठेवलं आहे. ते गेल्या 71 दिवसांपासून अटारी सीमेवर इतर 97 पाकिस्तानी नागरिकांसह अडकून पडले आहेत. या बाळाचे पालक निंबूबाई आणि बालम राम हे पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यातील आहे. बाळाचा जन्म भारत-पाक सीमेवर (Pakistani Woman Delivers Baby at Attari Border) झाल्यामुळे त्याचं नाव 'बॉर्डर' ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं (Couple Named their Newborn Baby Border) . निंबूबाई गरोदर होत्या आणि 2 डिसेंबरला त्यांची प्रसूती झाली. शेजारच्या पंजाबमधील गावातील काही स्त्रिया निंबूबाईंना बाळंतपणात मदत करण्यासाठी आल्या. स्थानिकांनी इतर मदत देण्याबरोबरच प्रसूतीसाठी वैद्यकीय सुविधांचीही व्यवस्था केली. बलम राम यांनी माहिती दिली की लॉकडाऊनपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आणि तीर्थयात्रेसाठी 98 नागरिकांसह ते भारतात आले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे ते घरी परत जाऊ शकले नाहीत. या लोकांमध्ये 47 लहान मुलांचा समावेश आहे ज्यापैकी सहा भारतात जन्मलेले आहेत आणि ते एक वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. बलम राम व्यतिरिक्त, त्याच तंबूत राहणारा आणखी एक पाकिस्तानी नागरिक लगया राम याने आपल्या मुलाचं नाव भारत असं ठेवलं आहे. कारण 2020साली जोधपूरमध्ये त्यांच्या बाळाचा जन्म झाला. लगाया जोधपूर येथे आपल्या भावाला भेटण्यासाठी आले होते. मात्र, ते पुन्हा पाकिस्तानात जाऊ शकले नाहीत. पाकिस्तानातील विविध जिल्ह्यांतील लोक सध्या अटारी बॉ४जवर आहेत. कारण पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना पाकिस्तानात प्रवेश नाकारला आहे. ही कुटुंबे अटारी आंतरराष्ट्रीय चेकपोस्टजवळील पार्किंगमध्ये तळ ठोकून आहेत. स्थानिक लोक त्यांना दिवसातून तीन वेळचे जेवण, औषधे आणि कपडे देत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Border, Pakistani, Viral news

    पुढील बातम्या