Home /News /national /

इंडोनेशियातील त्सुनामीचा भारताला धोका? पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची मोठी अपडेट

इंडोनेशियातील त्सुनामीचा भारताला धोका? पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची मोठी अपडेट

Earthquake in Indonesia: आज सकाळी इंडोनेशियातील पूर्व नुसा टेंगारा भागात 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या भूकंपानंतर इंडोनेशियामध्ये त्सुनामीचा (Tsunami alert in Indonesia) इशारा देण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 14 डिसेंबर: आज सकाळी इंडोनेशियातील पूर्व नुसा टेंगारा भागात 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला आहे. या भूकंपानंतर  इंडोनेशियामध्ये (Indonesia) त्सुनामीचा (Tsunami alert in indonesia) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या त्सुनामीचा आसपासच्या देशांना फटका बसण्याची शक्यता आहे. या इंडोनेशियातील त्सुनामीचा भारतालाही धोका आहे का? याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण याबाबत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मोठी अपडेट दिली आहे. इंडोनेशियातील भूंकपाचा आणि त्सुनामीचा भारताला कसलाही धोका नसल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 'ओसीयन इन्फोर्मेशन सर्व्हिस प्रोव्हाडर' संस्थेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी चिंता न करण्याचा सल्ला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी आलेल्या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाहीये. पण भूकंपाचे हादरे बसत असताना, अनेक घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले होते. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा-दुसरा डोस न घेतल्यास महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात नागरिकांना होणार 500रुपये दंड या भूकंपाचा केंद्रबिंदू फ्लोरेस बेटाच्या पूर्वेकडील लारंटुकाच्या वायव्येला 112 किमी अंतरावर 12 किमी खोलीवर होता. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर मलुका, पूर्व नुसा टेंगारा, पश्चिम नुसा टेंगारा, आग्नेय आणि दक्षिण सुलावेसी परिसरात त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित परिसरात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत अधिकची माहिती देताना, भारत सरकारच्या 'ओसीयन इन्फोर्मेशन सर्व्हिस प्रोव्हाडर' या संस्थेनं सांगितलं की, आज सकाळी साडेआठच्या सुमारास इंडोनेशियातील काही भागात 7.3 रिश्टर स्केलचे भूंकपाचे हादरले बसले आहेत. त्यामुळे भूकंपाच्या केंद्रबिंदू परिसरात त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. ओसीयन इन्फोर्मेशन सर्व्हिस प्रोव्हाडर ही संस्था भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळील पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहे. येथील त्सुनामीचा भारताला कसलाही धोका नसल्याचं या संस्थेनं सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India, Weather update

    पुढील बातम्या