बंगळुरू, 23 जानेवारी : प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांच्या गोष्टी चित्रपटातच घडतात असं नाही तर प्रत्यक्षातही काही प्रकार समोर येत असतात. बंगळुरुतील अशीच एक लव्ह स्टोरी समोर आली आहे. पोलिसांनी पाकिस्तानमधून आलेल्या 19 वर्षांच्या तरुणीला तिच्या भारतीय प्रियकरासोबत अटक केलीय. ही मुलगी लुडो खेळता खेळता भारतीय मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुलाचं नाव मुलायम सिंह यादव असं आहे. काही दिवसात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर मुलीने त्याच्यासाठी फक्त घरच सोडलं असं नाही तर देशाची सीमा ओलांडून सप्टेंबर 2022 मध्ये भारतात पोहोचली. तिने प्रियकरासोबत लग्नही केलं पण याची माहिती पोलिसांना मिळताच आता ते अडचणीत आले आहेत.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. प्रियकराने तिला आश्रय दिल्याबद्दल त्यालाही अटक केली आहे. पोलीस चौकशीत प्रेमी युगुलाने सांगितलं की, दोघेही बराच वेळ मोबाइल अॅपवर लुडो खेळायचे. यावेळी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या इकरा जीवानीची उत्तर प्रदेशातील मुलायम सिंह यादव याच्याशी ओळख झाली. त्यानंतर मैत्री आणि प्रेमही झालं. पण भेटायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शेवटी मुलीने स्वत: घर सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. नेपाळमार्गे ती सप्टेंबर महिन्यात भारतात प्रवेश करून बंगळुरुत पोहोचली.
हेही वाचा : नशेत मुंबईच्या तरुणीने बंगळुरुतून मागवली बिर्याणी; झोमॅटोने दिला रिप्लाय
पाकिस्तानी मुलगी इकरा जीवानीने सांगितलं की, सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय प्रियकराकडे आली. काही दिवस त्याच्यासोबत राहिल्यानंतर हिंदू परंपरेनुसार लग्न केलं आणि पती-पत्नी म्हणून एकत्र रहायला लागले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने खोटी कागदपत्रे बनवून फक्त भारतात प्रवेश नव्हे तर अवैधरित्या इथे राहतसुद्धा होती. तिच्या प्रियकराने सर्व काही माहिती असूनही तिला इथे ठेवलं यामुळे त्यालाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण 26 वर्षांचा असून मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. बंगळुरुत तो एका एमएनसीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तिथे एकटाच राहत असल्यानं वेळ घालवण्यासाठी लुडो खेळायचा. तिथेच त्याला पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये राहणाऱ्या मुलीशी ओळख झाली. पाकिस्तानमधून आल्यानंतर ती मुलगी मुलायम यादवसोबत बंगळुरुतील लेबर क्वार्टर्समध्ये राहत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.