नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: एक दिवस असा येईल की पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताचा भौगोलिक भाग असेल, हे वाक्य अन्य कोणी नाही तर देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370वरून दोन्ही देशातील संबंध तणावाचे झाले असताना जयशंकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्याच बरोबर जयशंकर यांनी हे देखील स्पष्ट केले की, पाकिस्तानसोबत तोपर्यंत संबंध सुधारता येणार नाहीत जोपर्यंत ते दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाहीत.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाने कामाचा आढावा सादर केला. तेव्हा बोलताना जयशंकर यांनी पाक व्याप्त काश्मीर संदर्भात मोठे विधान केले. लवकरच POK भारताचा भौगोलिक भाग असेल असे ते म्हणाले. पाकिस्तान एक युनिक चॅलेंज आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान कलम 370च्या मुद्दयावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर आरोप करत आहे, तो मुद्द द्विपक्षीय नसून भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे जयशंकर म्हणाले.
EAM S. Jaishankar: PoK (Pakistan Occupied Kashmir) is a part of India and we expect one day we will have physical jurisdiction over it. pic.twitter.com/9XUVAbnVor
— ANI (@ANI) September 17, 2019
कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी POK संदर्भात वक्तव्य केले आहेत. काहीच दिवसांपूर्वी जितेंद्र सिंह यांनी देखील सरकारचे पुढील धोरण हे POK मिळवण्याचा असल्याचे वक्तव्य केले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेताना सिंह यांनी हे वक्तव्य केले होते. आता थेट परराष्ट्र मंत्र्यांनीच POK संदर्भात वक्तव्य केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. जयशंकर यांनी कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी भारत आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे सांगितले. जाधव यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले आहेत. एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या देशात परत आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; मुस्लिम राष्ट्रांनी इम्रान खान यांना फटकारले!
काश्मीरवरून(Kashmir Issue) प्रत्येक दोन दिवसांनी भारताला धमकी देणारे आणि भारताविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणारे पाकिस्तान(Pakistan)चे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan)यांना असा काही दणका बसला आहे की ते कधीच विसरणार नाहीत. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा विषय आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला. अगदी संयुक्त राष्ट्र संघात देखील काश्मीर विषय नेला पण पाकिस्तानला कोणीच उभे करून घेतले नाही. त्यानंतर इम्रान खान यांनी अण्विक युद्धाची धमकी देखील दिली. हे सर्व करून झाल्यानंतर खान यांनी काश्मीर विषयावर जागतिक राजकारणात प्रभावशाली असलेल्या मुस्लिम देशांच्या दारात इम्रान खान गेले. पण मुस्लिम देशांनी देखील त्यांना उभे करुन घेतले नाही.
जागतिक राजकारणात प्रभावशाली असलेल्या काही मुस्लिम देशांना काश्मीर संदर्भात पंतप्रधान इम्रान खान यांना साथ दिली नाही. उटल इम्रान खान यांना सुनावले. पाकिस्तानने भारताशी अनौपचारिक चर्चा करण्याचा प्रयत्न करावा. काश्मीरवरुन सुरु असलेला तणाव कमी करण्यासाठी प्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरुद्ध सभ्य भाषेत बोलण्याचा सल्ला मुस्लिम देशांनी इम्रान खान यांना दिला आहे.
सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा