मराठी बातम्या /बातम्या /देश /Exclusive : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; दहशतवादी कॅम्प LOC जवळ हलवून घुसखोरीचा प्रयत्न

Exclusive : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; दहशतवादी कॅम्प LOC जवळ हलवून घुसखोरीचा प्रयत्न

दहशतवादी संघटना सैन्यावर युद्धबंदीचे उल्लंघन करण्यासाठी दबाव आणत आहेत, त्यामुळे पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याची शक्यता आहे, असं वृत्त CNN-News18 ने अलीकडेच दिलं होतं.

दहशतवादी संघटना सैन्यावर युद्धबंदीचे उल्लंघन करण्यासाठी दबाव आणत आहेत, त्यामुळे पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याची शक्यता आहे, असं वृत्त CNN-News18 ने अलीकडेच दिलं होतं.

दहशतवादी संघटना सैन्यावर युद्धबंदीचे उल्लंघन करण्यासाठी दबाव आणत आहेत, त्यामुळे पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याची शक्यता आहे, असं वृत्त CNN-News18 ने अलीकडेच दिलं होतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : पाकिस्तानने (Pakistan) नियंत्रण रेषा म्हणजे एलओसीजवळ (Line of Control) आपले सर्व दहशतवादी कॅम्प (Terror camps) आणि लाँच पॅड (Launch Pads) यांची जागा बदलली आहेत. प्रत्येक लाँच पॅड आणि दहशतवादी तळ सीमेपासून (Border) अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असतील, अशा पद्धतीने ठिकाणं निवडण्यात आली आहेत, अशी एक्सक्लुझिव्ह माहिती CNN-News18 ला मिळाली आहे. भारतात घुसखोरी वाढवण्यासाठी पाकिस्तानने हे कृत्य केल्याचं गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांचं म्हणणं आहे. तसंच हे दहशतवादी कॅम्प लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba), जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed ) आणि हिज्बुल मुजाहिदीन (Hizbul Mujahideen ) या जिहादी दहशतवादी गटांचे आहेत.

    “नकाशे पाहिल्यावर आम्हाला लक्षात येतं की दहशतवाद्यांकडे भारतात घुसण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी अनेक प्रवेश मार्ग हे आपल्या बाजूने गोळीबार टाळण्यासाठी आणि भारतीय सुरक्षा दलांना व्यग्र ठेवण्यासाठी आहेत,” असे सूत्रांनी सांगितले. CNN-News18 ला गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपुटनुसार, सध्या सीमेजवळील सर्व लाँच पॅड प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भरलेले आहेत आणि ते थेट पाकिस्तानच्या ISI द्वारे मॅनेज केले जात आहेत.

    महाराष्ट्रापासून अफगाणिस्तानपर्यंत जमीन हादरली; जम्मू काश्मीरमध्ये 72 तासात 7 वेळा भूकंप

    आधीच पाकिस्तानने ड्रोनच्या (Drones) मदतीने जवळपास 300 छोटी शस्त्रं (Weapons) भारतात पोहोचवली आहेत, अशातच हे दहशतवादी भारतात घुसण्यात यशस्वी ठरले तर ही घुसखोरी (Infiltration) ISI साठी बोनस ठरेल, असं सूत्रांचं मत आहे. ही 300 छोटी शस्त्रं हायब्रीड किलिंगसाठी श्रीनगर आणि आसपासच्या भागांत पोहोचली आहेत. एका अंदाजानुसार, एलईटी आणि जैशचे जवळपास 50 परदेशी दहशतवादी श्रीनगर शहरात आहेत. त्यांना तिथं ठेवण्यात आलं असून, संधी मिळाल्यावर ते त्यांना सोपवलेली दहशतवादी कृत्यं करतील, असं सूत्रांनी सांगितलं.

    आणखी एका राज्याचं मुख्यमंत्रिपद धोक्यात; यंदा भाजपचा काय आहे प्लान?

    दहशतवादी संघटना सैन्यावर युद्धबंदीचे उल्लंघन करण्यासाठी दबाव आणत आहेत, त्यामुळे पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याची शक्यता आहे, असं वृत्त CNN-News18 ने अलीकडेच दिलं होतं. पाकिस्तानातील पेशावर, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये मोठ्या संख्येने प्रशिक्षित केडर बसले आहेत. हे केडर नांगरहार आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) इतर सीमावर्ती प्रदेशांतून परतले आहेत. त्यांना तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानमध्ये घुसू न दिल्याने ते भारताविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाले. आता त्यांना भारतात घुसखोरी करण्यास पाकिस्तानी आर्मी (Pakistan Army) एलओसीवरून मदत करेल, असं सूत्रांनी सांगितलं.

    इंटर-सर्व्हिसेस इंटिलिजन्सच्या (ISI) मदतीने, पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीन क्लस्टर्समध्ये दहशतवादी छावण्या कशा चालवल्या जात आहेत, या संदर्भातही CNN-News18 ने वृत्त दिलं होतं. मानशेरा, मुजफ्फराबाद आणि कोटली या क्लस्टरमध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, अल-बदर आणि हरकत-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटना कॅम्प चालवत आहेत. मानशेरा क्लस्टरचे बोई, बालाकोट आणि गढ़ी हबीबुल्ला इथं कॅम्प आहेत. तर, मुजफ्फराबाद क्लस्टरमध्ये चेलाबंदी, शवाईनाला, अब्दुल्ला बिन मसूद आणि दुलई इथं कॅम्प आहेत. पाकिस्तानी सैन्याचे तीन PoK ब्रिगेड कोटली क्लस्टरच्या सेन्सा, कोटली, गुलपूर, फागोश आणि डुबगी कॅम्पमधील कारवायांबद्दल समन्वय साधत आहे. हे कॅम्प प्रामुख्याने सीमेलगत 2-3 किलोमीटरमध्ये असलेल्या भारतातील गुरेझ (Gurez), केल, नीलम व्हॅली (Neelum Valley), तंगधर, उरी चकोटी, गुलमर्ग, पूँछ, राजौरी, नौशेरा (Naushera)आणि सुंदरबनी सेक्टर या भागांमध्ये लाँच पॅडसाठी फीडर म्हणून काम करतात, असंही सूत्रांनी सांगितलं.

    First published:

    Tags: Pakistan, Terrorist