Home /News /national /

गावकऱ्यांनी 'तो' पाकिस्तानी ड्रोन पाहिला आणि.... 15 ऑगस्टला होती घातपाताची योजना

गावकऱ्यांनी 'तो' पाकिस्तानी ड्रोन पाहिला आणि.... 15 ऑगस्टला होती घातपाताची योजना

टिफिन बॉक्समध्ये IED स्फोटकं सापडली आहेत. भारताच्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day) मोठा बॉम्बस्फोट (Bomb blast) करून घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा (Terrorist plan) कट गावकऱ्यांच्या (Villagers) सतर्कतेमुळे उधळला गेला आहे.

    अमृतसर, 9 ऑगस्ट : भारताच्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day) मोठा बॉम्बस्फोट (Bomb blast) करून घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा (Terrorist plan) कट गावकऱ्यांच्या (Villagers) सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. भारत पाकिस्तान सीमेवरच्या पंजाबमधील (Punjab) एका ग्रामीण भागात पाकिस्तानमधून एक ड्रोन आला. या ड्रोनमधून काही शस्त्रास्त्रं, स्फोटकं आणि स्फोटासाठीचं साहित्य भारतीय हद्दीतील डलिके गावात टाकण्यात आलं होतं. ग्रामस्थांची सतर्कता पंजाबमधील सटिके हे गाव पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. या गावात पाकिस्तानच्या दिशेनं एक ड्रोन आला आणि त्यातून एक पिशवी गावात टाकण्यात आली. या पिशवीत अनेक छोट्या छोट्या पिशव्या होत्या. त्यामध्ये आयईडी, हँड ग्रेनेड्स आणि काडतुसं होती. या पिशवीत काही टिफिन बॉम्बही ठेवण्यात आले होते. हे बॉम्ब अशा पद्धतीने तयार करण्यात आले होते, की मोबाईलचा वापर करून त्यांचा स्फोट घडवणं शक्य झालं असतं. मात्र ग्रामस्थांचं या ड्रोनकडे लक्ष गेल्यामुळे त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली आणि पोलिसांनी हे साहित्य जप्त केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पिशवीतील बॉम्बमध्ये 2 किलो आरडीएक्स वापरण्यात आलं होतं. या बॉम्बला चुंबकाच्या मदतीनं असं तयार करण्यात आलं होतं, की त्याची जराही चुकीच्या पद्धतीनं कुणी हाताळणी केली, तर लगेच त्याचा स्फोट व्हावा. हे बॉम्ब गर्दीच्या ठिकाणी अधिकाधिक नरसंहार घडवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. विशेषतः स्वातंत्र्यदिनी मोठा घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा हा कट असावा, असा संशय पोलिसांना आहे. हे वाचा - 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास होणार सुरू; होऊ नका Coronaचे वाहक, अशी घ्या काळजी पंजाबमध्ये या घटनेनंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सीमेपलिकडून येणाऱ्या प्रत्येक ड्रोनवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानधील दहशतवादी संघटना ड्रोनचा वापर करून भारतात हल्ले घडवत असल्याचं दिसून आलं आहे. काश्मीरमधील एअरफोर्सच्या बेसवर टाकलेल्या बॉम्बनंतर अऩेक ड्रोन भारतीय सैन्य आणि पोलिसांनी निकामी केले आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bomb Blast, Independence day, Pakistan, Punjab

    पुढील बातम्या