नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: श्रीनगरवरून शारजाला (Pakistan denies air space for Srinagar Sharjah flight) जाणाऱ्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून उडायला पाकिस्ताननं परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानचा पुन्हा एकदा तीळपापड झाल्याचं या घटनेतून दिसून येत (Pakistan jealous on the service) असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. मंगळवारी श्रीनगरवरून उड्डाण केलेल्या विमानाला आपल्या एअरस्पेसमधून प्रवास करण्यास पाकिस्ताननं मनाई केली. त्यामुळे विमानाला लांबचा प्रवास (Flight had to take long route) करून शारजाला पोहोचावं लागलं.
Very unfortunate. Pakistan did the same thing with the Air India Express flight from Srinagar to Dubai in 2009-2010. I had hoped that @GoFirstairways being permitted to overfly Pak airspace was indicative of a thaw in relations but alas that wasn’t to be. https://t.co/WhXzLbftxf
— Omar Abdullah (@OmarAbdullah) November 3, 2021
पाकिस्तानचा संताप
जम्मू काश्मीरमधून थेट शारजाला भारत सरकारनं विमानसेवा सुरु केल्यामुळे पाकिस्तानचा संताप झाला आहे. यापूर्वीदेखील अनेकदा काश्मीरमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पाकिस्तानने आपली एअरस्पेस नाकारली होती. जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला तिथून आंतरराष्ट्रीय सेवा सुरु होणं, हे सोयीचं वाटत नसल्याचंच हे लक्षण असल्याचं मानलं जात आहे.
श्रीनगर-शारजा सेवा
23 ऑक्टोबर या दिवशी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी श्रीनगर-शारजा फ्लाईटला हिरवा झेंडा दाखवला होता. गो फर्स्ट एअर या कंपनीनं ही विमानसेवा सुरू केली आहे. श्रीनगरवरून थेट शारजापर्यंत विमानसेवा सुरू करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. प्रत्येक आठवड्यात श्रीनगर ते शारजादरम्यान चार विमानफेऱ्या असणार आहेत. या विमानसेवेमुळे दोन देशांतील व्यापारी संबंध वाढतील आणि सलोखादेखील वृद्धिंगत होईल, असं सांगण्यात येत आहे.
भारताने परवानगीच घेतली नसल्याचा दावा
पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याबाबत भारताने परवानगीच घेतली नव्हती, असा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. श्रीनगरवरून उडणारी फ्लाईट पाकिस्तानी हद्दीतून जाणार असेल, तर आपली परवानगी गरजेची असल्याचा दावा पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी केल्याचं समजतं आहे. यापूर्वी केवळ विशेष प्रसंगात अशी परवानगी दिली गेली होती. मात्र नियमित उड्डाणांसाठी हा निकष लावता येणार नसल्याचा कांगावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.
हे वाचा- प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवा, लसीकरणाचा वेग वाढवा! पंतप्रधानांच्या सूचना
ओमर अब्दुल्लांकडून खेद
श्रीनगरहून शारजाला जाणाऱ्या विमानाला पाकिस्ताननं एअरस्पेस नाकारणं हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे. पाकिस्तानला भारतासोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी होती, मात्र अशा कृतीतून ते ही संधी गमावत असल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.