• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवा, लसीकरणाचा वेग वाढवा! पंतप्रधान मोदींच्या सूचना

प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवा, लसीकरणाचा वेग वाढवा! पंतप्रधान मोदींच्या सूचना

देशात लसीकरणाचा (Plan separate strategy for each village says PM Modi to district collectors) वेग वाढवण्यासाठी प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: देशात लसीकरणाचा (Plan separate strategy for each village says PM Modi to district collectors) वेग वाढवण्यासाठी प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना (Lower vaccination districts) त्यांनी हे आवाहन केलं आहे. प्रत्येक गाव आणि खेड्यासाठी हवं तर वेगळी रणनिती बनवा, मात्र लसीकरणाचा वेग वाढवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करा, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या. काही जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग कमी महाराष्ट्र, मेघालय, अरुणाचल प्रदेश, झारखंड, मणिपूर, नागालँड आणि मेघालयासह काही राज्यांत एकूण 40 पेक्षा अधिक असे जिल्हे आहेत, जिथं 50 टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झालं आहे. तर कोरोनाची दुसरी लस घेणाऱ्यांचं प्रमाण हे त्याहूनही कमी आहे. अशा जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित होते. टीम बनवण्याच्या सूचना जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी 20 ते 25 जणांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले. या टीममधील सदस्य वेगवेगळ्या उपाययोजना करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करू शकतील. अशा वेगवेगळ्या टीममध्ये एक निकोप स्पर्धा असेल आणि त्यानिमित्तानं लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य होऊ शकेल, अशी कल्पना पंतप्रधान मोदींनी सुचवली. स्थानिक भाषेत प्रचार करा अनेक राज्यांतील नागरिकांना केवळ स्थानिक भाषाच बोलता येतात आणि मसजतात. अशा नागरिकांपर्यंत लसींचे फायदे पोहोचवण्यासाठी स्थानिक भाषेत प्रचार करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. स्थानिक भाषेत केलेला प्रचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि नागरिकांना लसीकरणासाठी प्रेरणादायी ठरू शकेल, असं ते म्हणाले. इतर जिल्ह्यांचं मार्गदर्शन घ्या ज्या जिल्ह्यांत लसीकरणाचं उत्तम रेकॉर्ड नोंदवलं गेलं आहे, तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून नेमक्या काय उपाययोजना केल्या, त्याची माहिती घेण्याची सूचनाही पंतप्रधान मोदींनी केली. काही ठिकाणी धर्मगुरुंची मदत घेऊन लसीकरणाबाबत प्रबोधन मोहिम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. हे वाचा- आज कुछ तुफानी करते है! तरुणाने पेट्रोल पंपावर फेकला पेटलेला फटाका, भयावह VIDEO देशात आतापर्यंत 78 टक्के लोकसंख्येला पहिला डोस तर 35 टक्के लोकसंख्येला दुसरा डोस दिला गेला आहे.
  Published by:desk news
  First published: