नवी दिल्ली, 14 एप्रिल : गेल्या दशकात भारताने आरोग्य, पायाभूत क्षेत्र त्यानंतर शिक्षण आणि नोकऱ्यांच्या क्षेत्रात लक्षणीय सुधारणा केल्या आहेत, असं ‘न्यूज18’ने सध्या सुरू असलेल्या रायझिंग इंडिया समिटच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्यांना वाटतं. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतेकांना असं वाटतं, की पद्म पुरस्कारांसारखे सन्मान गेल्या दशकापासून अधिक लोकशाही पद्धतीनं दिले जात आहेत. आता अनेक सर्वसामान्य भारतीयांना त्यांच्या अनुकरणीय कार्यासाठी सन्मानित केलं जात आहे. रायझिंग इंडिया समिटच्या निमित्ताने न्यूज 18 ने देशभरातील नागरिकांचं सर्वेक्षण केलं. यात आरोग्य, शिक्षण, नोकरी, पद्म पुरस्कार याबाबतही नागरिकांचं मत घेण्यात आलं. इन्स्टाग्रामवरच्या आकडेवारीचा विचार केल्यास, सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या 30 टक्के जणांनी सांगितलं की भारताने पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रात लक्षणीय प्रशासकीय सुधारणा केली आहे. 24 टक्के जणांनी शिक्षण आणि नोकऱ्यांच्या बाजूनं मतदान केलं आहे. महिला कल्याणाला 16 टक्के मतं मिळाली, तर उर्वरित 30 टक्के जणांनी वरच्या सर्व घटकांना मतदान केलं. ट्विटरवर प्रतिसाद देणाऱ्यांपैकी 44.10 टक्के जणांनी पायाभूत सुविधा आणि आरोग्यासाठी, 8.60 जणांनी शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी, 4.30 टक्के जणांनी महिला कल्याणासाठी, तर 43 टक्के जणांनी या सर्व घटकांना मतदान केलं. 2014 नंतर पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होतोय का? पाहा काय म्हणतात लोक पद्म पुरस्कार आणि सामान्य भारतीयांना मिळालेल्या सन्मानाबद्दल विचारलं असता, इन्स्टाग्रामवरच्या सर्वेक्षणात सहभागी झालेले 50 टक्के जण म्हणाले, की `हा प्रतिष्ठित सन्मान निश्चितपणे अधिक लोकशाही पद्धतीनं दिला जात आहे.` `काहीसा` असं मत 19 टक्के जणांनी व्यक्त केलं, 16 टक्के जणांनी `नाही` असं, तर 15 टक्के जणांनी `सांगता येत नाही`, असं मत नोंदवलं. ट्विटरवर ही आकडेवारी अनुक्रमे 83.10 टक्के, 2.80 टक्के, 9.90 टक्के आणि 4.20 टक्के होती. या सर्वेक्षणात केवळ ट्विटरवर एक शेवटचा प्रश्न विचारला गेला. तो असा होता, की सरकारी धोरणं भारताला उत्पादन क्षेत्रात महासत्ता बनवू शकतात का? यावर 57.90 टक्के जणांनी `होय` असं, तर 10.50 टक्के जणांनी `कदाचित` असा कौल दिला. 31.60 टक्के जणांनी `सुधारणांची गरज आहे` असं म्हटलं आहे. AI PHOTO - भारत-पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर…; शोधूनही पाहायला मिळणार नाही असं अद्भुत दृश्य `न्यूज 18` ने रायझिंग इंडिया इनिशिएटिव्ह उपक्रमातून वैचारिक गाभा असलेल्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, तसंच देशाला निर्णायक चर्चा, अनेक नवकल्पना आणि भविष्यात काय दडलंय याची ओळख करून देण्यावर लक्ष केंद्रित केलं. 29 आणि 30 मार्च रोजी नवी दिल्लीत आयोजित शिखर परिषदेची थीम ‘उभरत्या भारताचे नायक’ अशी होती. ज्यांनी असामान्य सामाजिक प्रभाव पाडला आहे अशा सर्वसामान्य व्यक्तींच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक या वेळी करण्यात आलं. हा मेगा इव्हेंट पूनावाला फिनकॉर्पने हिंदुस्तान टाइम्सच्या भागीदारीने, तसंच आरआयएल, डिजिटल पार्टनर हॅवेल्स, सोशल इनोव्हेशन पार्टनर M3M फाउंडेशन यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. या वेळी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि कॉर्पोरेट जगतातल्या मान्यवरांनी या मंचावर आपले विचार मांडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.