नवी दिल्ली, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच अशा पद्म पुरस्काराची (Padma Awards 2022) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून यंदा ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसंच सीरमसंस्थेचे सायरस पुनवाला यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मनोरंजन क्षेत्रातून सुलोचना चव्हाण आणि सोनू निगम यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहे.
पद्म पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले सीडीओ जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाले आहे. एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
यावर्षी एकूण ४ मान्यवरांना ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाले असून महाराष्ट्रातून प्रतिभावंत गायिका,संगित रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका आणि विदुषी प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील एकूण १७ मान्यवरांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे आणि डॉ. हिंमतराव बावस्कर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ लावणी गायिका व पार्श्वगीत गायिका सुलोचना चव्हाण आणि प्रसिध्द पार्श्व गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
यावर्षी एकूण १२८ पद्मपुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ४ ‘पद्मविभूषण’, १७ ‘पद्मभूषण’ आणि १०७ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. १० अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रासाठी जाहीर झाले पद्म पुरस्कारपद्मविभूषण कला - प्रभा अत्रे पद्मभूषणउद्योग - नटरंजन चंद्रशेखरनआरोग्य - सायरस पुनवालापद्मश्रीआरोग्य - हिंमतराव बावस्करआरोग्य - विजयकुमार विनायक डोंगरेकला - सुलोचना चव्हाणकला - सोनू निगमविज्ञान आणि इंजिनियरिंग - अनिलकुमार राजवंशीआरोग्य - भीमसेन सिंघलआरोग्य - बालाजी तांबे (मरणोत्तर)
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.