S M L

विमानतळावर चहा-काॅफीचे भाव ऐकून पी.चिदंबरम यांना बसला धक्का

देशातील वाढत्या महागाईमुळे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरमही हैराण झाले आहेत. चेन्नई विमानतळावरील चहा आणि कॉफीचे भाव ऐकून त्यांना धक्का बसला असून वाढत्या महागाईवर त्यांनी चिंता व्यक्त केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 26, 2018 02:36 PM IST

विमानतळावर चहा-काॅफीचे भाव ऐकून पी.चिदंबरम यांना बसला धक्का

चेन्नई, 26 मार्च : देशातील वाढत्या महागाईमुळे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरमही हैराण झाले आहेत. चेन्नई विमानतळावरील चहा आणि कॉफीचे भाव ऐकून त्यांना धक्का बसला असून वाढत्या महागाईवर त्यांनी चिंता व्यक्त केलीय. 'विमानतळावर चहाची किंमत १३५ रुपये आणि कॉफीची किंमत १८० रुपये असल्याचं पाहून मी घाबरून गेलो आहे. धास्तावलो आहे. कदाचित मी आउटडेटेडही झालो असेल,' असं टि्वट चिदंबरम यांनी केलं. दरम्यान त्यांच्या या ट्विटमुळे त्यांना ट्विटरवर बरेच विचित्र रिप्लाय मिळाले आहेत.

'चेन्नई विमानतळावर मी चहाची ऑर्डर दिली होती. गरम पाणी आणि टी बॅग मला देण्यात आली. त्याची किंमत होती १३५ रुपये. भयंकर आहे. मी चहा घेण्यास नकार दिला. मी बरोबर आहे की चुकीचा?,' असं चिदंबरम यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Loading...
Loading...

त्यानंतर त्यांनी आणखी एक टि्वट केलं. 'विमानतळावर कॉफीची किंमत १८० रुपये आहे. मी विचारलं, 'कोण घेतं ही कॉफी'. तर उत्तर होतं, 'बरेच लोक.' खरंच मी आऊटडेटेड झालोय का?,' असा सवालही त्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 02:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close