नवी दिल्ली, 21 जुलै : कोरोनाव्हायरसविरोधातील लशीची (Coronavirus vaccine) प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. अशात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने (Oxford University) अखेर गूड न्यूज दिलीच. ऑक्सफर्डच्या लशीचा मानवी चाचणी परिणाम जाहीर झाले. पहिल्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम सकारात्मक आले आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाला. आता या लशीमुळे आशा पल्लवित झाल्यात. भारतातही लवकरच या लशीचं ह्युमन ट्रायल होणार आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्युने (pune serum institute) ऑक्सफर्डच्या लशीचं भारतात ह्युमन ट्रायल करण्याचा विचार करत आहे. यासाठी संस्थेने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DGCI) ही परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर ऑगस्टपासून या लशीचं ट्रायल केलं जाईल.
Congratulations to the teams at @UniofOxford and @AstraZeneca for getting this product data, out. It all seems to be doing well. Hope to get positive results in the phase three trials in a few months. We also hope to start phase three trials in India soon. #COVID19vaccine https://t.co/Zroalob7mO
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) July 21, 2020
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अस्ट्राझेनका ( AstraZeneca) कंपनीने तयार केलेली ही लस आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही या संस्थेची करार केला आहे. हे वाचा - N-95 मास्कचा वापर करत आहात तर सावधान! सरकारने दिला न वापरण्याचा इशारा सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला म्हणाले, “ऑक्सफर्ड लशीच्या चाचणीचे सकारात्मक रिझल्ट पाहायला मिळाला आणि आम्ही त्याबाबत खूप आनंदी आहोत. या लशीचं भारतातही ट्रायल व्हावं यासाठी डीजीसीआयकडे परवानगी मागणार आहे. परवानगी मिळताच भारतातही या लशीचं ट्रायल सुरू होणार आहे. इतकंच नव्हे तर आम्ही मोठ्या प्रमाणात या लशीचं उत्पादनही करणार आहोत. जवळपास एक अब्ज डोसचा आम्ही पुरवठा करणार आहोत” दरम्यान या लशीची किंमत एक हजार रुपये असणार असल्याचंदेखील याआधी सीरम इन्स्टिट्युटच्या सीईओंनी सांगितलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे संशोधित केलेल्या या लशीच्या चाचण्यांचा अहवाल The Lancet या नामवंत विज्ञान प्रकाशनामध्ये प्रसिद्ध झाला. त्यामध्ये ही लस सुरक्षित आणि आशादायी असल्याचं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या लशीचं स्वागत केलं आहे. पण तरीही अजून खूप काही बाकी आहे, असा सबुरीचा सल्लाही द्यायला WHO विसरलेली नाही. हे वाचा - Oxford Covid लशीची चाचणी यशस्वी; तरीही WHO ची पहिली प्रतिक्रिया सावधच! डॉ. माईक रायन यांनी WHO च्या वतीने या लशीवर प्रतिक्रिया दिली. “This is a positive result, but again there is a long way to go” असं त्यांनी म्हटलं आहे. चाचणीचे परिणाम चांगले आहेत पण अजून भरपूर वेळ आहे, असं त्यांनी सांगितलं. सप्टेंबरमध्ये लस येणार असं सांगितलं जात असताना WHO ची ही प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.