नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : भारताचे कायदामंत्री किरेन रिजिजू डान्स करत (Kiren Rijiju Dance Video goes viral) असतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला टॅग करत आमचे कायदामंत्री हे एक उत्तम डान्सर (Our law minister is a good dancer says PM Narendra Modi) असल्याची स्तुतीसुमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिजिजूंवर उधळली आहेत. अरुणाचल प्रदेशची जिवंत आणि गौरवशाली परंपरा पाहून आनंद वाटल्याची प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली आहे.
पारंपरिक नृत्य
अरुणाचल प्रदेशातील काजलंग गावात मिजी जमातीच्या नागरिकांनी किरेन रिजिजूंचं जोरदार स्वागत केलं. यावेळी त्यांनी पारंपरिक नृत्यही सादर केलं. नृत्याने आपला पाहुणचार होत असल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रिजिजू यांनीदेखील संगीतावर ताल धरत आपलं नृत्यकौशल्य दाखवून दिलं. या गावातील काही प्रकल्पांना भेट देत असतागेना ग्रामस्थांनी केलेल्या आदरातिथ्यानं आपण भारावून गेल्याचं रिजिजू म्हणाले.
During my visit to beautiful Kazalang village to monitor the Vivekananda Kendra Vidyalaya Projects. This is traditional merrymaking of Sajolang people whenever guests visit their village. The original folk songs and dances are the ESSENCE of every community in Arunachal Pradesh. pic.twitter.com/TTxor4nQJF
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 29, 2021
पंतप्रधानांनी केलं कौतुक
पांढरा शर्ट, ट्राऊझर, शूज आणि जॅकेट या पेहरावात नृत्य करणाऱ्या कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या या व्हिडिओचं पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं आहे. आपले कायदामंत्री एक उत्तम डान्सर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रिजिजू यांनी ट्विट केलेला एक मिनिटाचा व्हिडिओ रिट्विट करत त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या गौरवशाली संस्कृतीचं कौतुक केलं आहे.
हे वाचा - तालिबानी फायटरला करायचंय 13 वर्षांच्या मुलीसोबत लग्न, भावाला येतेय धमकी
किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार असून फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखले जातात. हेल्थ आणि फिटनेससंदर्भातील वेगवेगळे व्हिडिओज ते शेअर करत असतात. ते एक उत्तम गायकदेखील आहेत. अनेकदा आपल्या गाण्याचे व्हिडिओजही ते शेअर करतात. रिजिजू यांचे राजकारणापलिकडचे हे गुण त्यांच्या चाहत्यांना विशेष भावतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dancer, Pm narendra mdi, Viral video.