• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राहुल गांधींचं 'ब्रेकफास्ट पॉलिटिक्स'; मोदी सरकारला घेरण्यासाठी 14 विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत बैठक

राहुल गांधींचं 'ब्रेकफास्ट पॉलिटिक्स'; मोदी सरकारला घेरण्यासाठी 14 विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत बैठक

Rahul Gandhi organise breakfast meeting of opposition party mps: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधकांना एकजुट करत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करत मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची एक बैठक बोलावली आहे. ही ब्रेकफास्ट मिटिंग कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होत आहे. या बैठकीला देशातील 14 पक्षांचे जवळफास 100 खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ठाकरे सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप, नॅशनल कॉन्फरन्स, भाकप, माकप, राजद पक्षांच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचा समावेश आहे. या बैठकीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅससच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याची रणनीती तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मीटिंगसाठी राहुल गांधी यांनी 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदनातील खासदारांचा समावेश आहे. या बैठकीत सर्व नेते सभागृहातील उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांबाबत सरकारवर दबाव वाढवण्याच्या मार्गावर चर्चा करतील. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळत आहे. विविध मुद्द्यांवरुन विरोधक मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे वारंवार संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावे लागत आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: