मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ठाकरे सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ठाकरे सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होत असून आजच्या या बैठकीत पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची काही घोषणा राज्य सरकार करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होत असून आजच्या या बैठकीत पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची काही घोषणा राज्य सरकार करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होत असून आजच्या या बैठकीत पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची काही घोषणा राज्य सरकार करण्याची शक्यता आहे.

मुंबई, 3 ऑगस्ट : राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) आज मुंबईत (Mumbai) सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी साडेबारा वाजता होत आहे. या बैठकीकडे सर्व पूरग्रस्तांचे लक्ष लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत काही महत्त्वपूर्ण घोषणा पूरग्रस्तांसाठी (Flood relief package to affected people) होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून सांगली, कोल्हापूर परिसरामध्ये पूरग्रस्तांची पाहणी दौरा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी रत्नागिरी, रायगड परिसरामध्ये सुद्धा पूरग्रस्तांची पाहणी केली होती. मागील कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांसाठी एनडीआरएफ निकषांच्या पलिकडे जात आर्थिक मदत करण्याचं सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी केले होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या 28 जुलै रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत पंचनामे पूर्ण करून तात्काळ मदत देण्याची भूमिका घेण्यात आली होती. तत्पूर्वी सध्या बाधित कुटुंबांना घरातील साहित्य कपडे भांडी यांच्या नुकसानसाठी तात्काळ मदत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते तुम्ही साधारणतः प्रत्येक पूरग्रस्तांसाठी दहा हजार रुपये देण्याची भूमिका राज्य सरकारची होती. आजच्या बैठकीत देखील राज्य मंत्रिमंडळासमोर मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने सादरीकरण केले जाणार असून आत्तापर्यंत साधारणता महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये नेमके किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेतला जाणार आहे.

Tokyo Olympics: बेल्जियमकडून भारतीय टीमचा पराभव, 41 वर्षांनंतर भारतीय टीमचं हॉकी गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं 

पूरग्रस्तांसाठी थेट रोख स्वरूपातली रक्कम चेकद्वारे वाटप दोन दिवसाच्या आत महाराष्ट्रात सुरू होणार असून लोकांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यूज एटीन लोकमतला माहिती दिली.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी नव्याने आलेल्या आकडेवारीनुसार मदत तर जाहीर केली जाईल. पण ज्यांच्या घरात अद्यापी पाणी आहे अशांना पाणी कमी झाल्यावर तात्काळ मदत केली जाणार आहे. शेतीचे नुकसान झालेल्या लोकांना देखील नेहमीच्या एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जात मदत करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ज्या पूरग्रस्तांच्या घरी जनावर कोंबडी तसेच इतर पशुधन यांचे नुकसान झाला आहे अशा लोकांना सुद्धा राज्य सरकार अधिक दिलासा देण्याचा विचार करत आहे. साधारणत: आठ हजार कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राज्य सरकार केंद्र सरकारला पूरग्रस्त भागात पाणी करण्यासंदर्भात देखील पत्र पाठवला असून याबाबत देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल असे म्हटले जातं.

First published:

Tags: Maharashtra