कोलकाता, 22 मे : तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विरोधकांवर शाब्दिक हल्ला करताना नुसरत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नुसरत म्हणाल्या, ‘ते बंगालला काही देत नाहीत. बंगालचे लोक तुम्हाला मत देतील असे का वाटते? तुम्हाला एकही मत मिळणार नाही. पंचायत निवडणुकीच्या वेळी येथे जो कोणी येईल, मग तो भाजप असो वा काँग्रेस, त्यांना बशीरहाटचे लोक बांबूच्या दांड्याने फटकवतील, असं वक्तव्य नुसरत जहाँ यांनी केलंय. पश्चिम बंगालमधील बसीरहाटमध्ये बोलताना टीएमसी खासदार नुसरत जहाँ म्हणाल्या, ‘ते (विरोधक) आज काय षडयंत्र रचत आहेत ते पाहा. त्यांनी लोकांच्या विरोधात अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. धर्माशी खेळले पण काही चालले नाही. 2021 मध्ये ते म्हणाले ‘यावेळी 200 पार’ पण ते अपयशी झाले आणि त्यांची बोट बुडाली. ते यावेळी एक मोठा कट रचत आहेत. बंगालमध्ये त्यांनी लोकांचा पैसा रोखला असल्याचा आरोप नुसरत यांनी केला. वाचा - महाविकासआघाडीमध्ये ‘भाऊ’बंदकी, दादांच्या ‘नंबर’ गेमला बाबांचा पाठिंबा! पश्चिम बंगालचे पैसे रोखल्याचा केंद्रावर आरोप नुसरत म्हणाल्या, ‘ममता बॅनर्जींचे काम बंद पाडण्याचे हे षडयंत्र आहे. त्यांनी राज्याचा 100 दिवसांच्या हमी कृती योजनेसाठी निधी रोखून धरला आहे. ते बंगालला काही देत नाहीत. बंगालचे लोक तुम्हाला मत देतील असे का वाटते? तुम्ही त्यांच्यासाठी काय केले आहे? तुम्हाला एकही मत मिळणार नाही. पंचायत निवडणुकीच्या वेळी येथे जो कोणी येईल, मग तो भाजप असो वा काँग्रेस, त्याला बशीरहाटचे लोक बांबूच्या दांड्याने फटके देतील.
काँग्रेस आणि भाजपवर निशाणा तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नुसरत जहाँ बोलत होत्या. नुसरत जहाँच्या या वक्तव्यावरून विरोधक आणि तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. काँग्रेस आणि भाजप दोघेही हल्लेखोर आहेत.