नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : सत्ताधारी मोदी सरकार (Modi Government) विरोधात प्रथमच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (parliament monsoon session) विरोधक एकत्र येत आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. संसदेत विरोधी पक्षांनी एकत्र आल्यावर आता ही एकजुट कायम राखत भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस पक्षाने (Congress Party) रणनिती आखली आहे. काँग्रेसची विचारधारा आणि यूपीएतील घटक पक्ष तसेच समविचारी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sondia Gandhi) बैठक घेणार आहेत. या बैठकीत काँग्रेस प्रणित राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 20 ऑगस्ट रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समविचारी विरोधी पक्षांचे नेते, भाजप विरोधी पक्षांचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद्धा बैठकीत उपस्थित असणार आहेत.
राहुल गांधींनंतर रणदीप सुरजेवाला, अजन माकनसह अन्य 5 काँग्रेस नेत्यांचे Twitter अकाऊंट निलंबित
विरोधकांच्या गदारोळात यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजप प्रथमच बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं. यावेळी काँग्रेस पक्षाला इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची चांगली साथ मिळाली. विरोधी पक्षांची ही एकजूट कायम ठेवत आता काँग्रेस मोदी सरकारला धारेवर धरणार असल्याचं दिसत आहे.
The Opposition is united. On 20th August, Congress interim president Sonia Gandhi will speak to CMs of Congress-ruled states. Maharashtra CM Uddhav Thackeray will also take part in this meeting: Shiv Sena leader Sanjay Raut
— ANI (@ANI) August 12, 2021
न्यूज एजन्सी एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं की 20 ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sonia gandhi, Uddhav thackeray