Home /News /national /

Opinion : ...जेव्हा मोदी होतात संकटमोचक, दु:खाच्या प्रसंगात देतात साथ!

Opinion : ...जेव्हा मोदी होतात संकटमोचक, दु:खाच्या प्रसंगात देतात साथ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास देशातला कोणताही विरोधी पक्ष एकही संधी सोडत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा ही अशी भासवली जात आहे की, त्यांच्या मनात कुणाबद्दल आदर आणि भावना नाही. पण, टीकाकार कितीही टीका करत असले तरी त्यांची प्रतिमा ही राजकीय नेत्याच्या पलीकडे जाऊन एका काळजीवाहू व्यक्तीमत्वासारखीच आहे.

पुढे वाचा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी देशातला कोणताही विरोधी पक्ष एकही संधी सोडत नाही. त्यांच्या चांगल्या प्रतिमेला धक्का देण्याचाही वारंवार प्रयत्न केला जातो. पण, त्यांच्यावर  कितीही टीका होत असली तरी त्यांची प्रतिमा ही राजकीय नेत्याच्या पलीकडे जाऊन एका काळजीवाहू व्यक्तीमत्वासारखीच आहे. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांची भूमिका ही सरकारी पातळीवरच नाही तर खासगी पातळीवर सुद्धा मोलाची अशीच ठरली असून प्रोत्साहन देणारी आहे. त्यांनी आजपर्यंत अनेकांना मदत केली. पण, कधीच त्यांनी याचा प्रचार केला नाही. ज्या हजारो लोकांना त्यांनी व्यक्तिगत पातळीवर मदत केली आहे, त्यांनी सुद्धा कधी समोर येऊन याबद्दल सांगितले नाही. अलीकडेच टीव्ही अँकर आणि पत्रकार रुबिका लियाकत यांनी एक ट्वीट केले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका पत्राबद्दल ट्वीट केलं होतं आणि दुखाच्या प्रसंगात आपण मदत केल्याबद्दल आभार मानले होते. रुबिका यांच्या आई डॉक्टर फातमा लियाकत यांचं 28 मे रोजी निधन झालं. पंतप्रधान मोदी यांनी फातमा लियाकत यांच्याबद्दल शोकसंदेश लिहिला होता, हा संदेश फक्त शासकीय प्रथेचा भाग नव्हता, तो अत्यंत संवेदनशीलतेनं भरलेला होता. दिवंगत फातमा लियाकत यांच्या व्यक्तिमत्वाची चर्चा करणारा होता. रुबिका आणि माझी ओळख फार जुनी अशी नव्हती. चार वर्षांपूर्वी आम्ही एकाच मीडिया संस्थेच्या वेगवेगळ्या चॅनलमध्ये काम करत होतो. ऑफिसमध्ये येता जाता लिफ्टमध्ये आमची भेट होत होती. विचार केला की, रुबिका यांना फोन करून विचारपुस करू. आईचे निधन होणे ही मोठी दु:खद घटना असते, याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. रुबिका यांच्या आईची तब्येत खालावली, मदतीला आले पंतप्रधान मोदी रुबिका यांना फोन केला असता पंतप्रधान मोदी यांच्या पत्रामागील गोष्ट लक्षात आली. मागील महिन्यात 2 तारखेला रुबिका यांच्या आई फातमा लियाकत अचानक आजारी पडल्या होत्या. आईच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच रुबिका नोयडातून तातडीने आपल्या गावी उदयपूरला पोहोचली. फातमा लियाकत या जीव शास्त्रावर पीएचडी करत होत्या. पाण्यात राहणाऱ्या जीवसृष्टीवर हानिकारक धातूचा किती परिणाम होतो, याचं संशोधन त्या करत होत्या. फातमा आजारी पडल्या होत्या, रमजानच्या महिन्यात उपवास केल्यामुले गॅस्टोइंटेटायटिसमुळे आजार तर बळावला नाही ना, अशी भीती रुबिकाला होती. पण तब्येत आणखी खालावली आणि किडनी, यकृत आणि ह्रदयावर गंभीर परिणाम झाला. अनेक अवयव निकामी झाले, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनाच्या काळात अशी परिस्थितीत आजार उद्भवल्यामुळे कोविडची लागण तर झाली नाही ना, अशी भीती वाटली. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासण्या करण्यात आल्या आणि फातमा यांचे स्वादुपिंड खराब झाले होते, त्यामुळे पचनसंस्थेला विकार झाला होता. अचानक त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. त्यांनी कल्पनाही केली नव्हती, की पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट त्यांना फोन करतील. ईदच्या दिवशी कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत आईच्या आजारादरम्यान, कोणत्याही नातेवाईकाचा फोन आला नव्हता. मात्र त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला होता. रुबिका यांना काही कळायच्या आतच आवाज आला, 'रुबिकाजी, तुम्हाला ईदच्या अनेक शुभेच्छा'. रुबिका यांनी त्यांना आईच्या आजाराबद्दल सांगितलं, तेव्हा पंतप्रधानांनी त्यांची सविस्तर चौकशी केली आणि संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर आयसीयू बेडवर असलेल्या फातमा लियाकत यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. रुबिका यांनी आपल्या आईला फोन दिला. त्यांची आई बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती. परंतु पंतप्रधान मोदींचा फोन असल्याने त्यांनी कसा बसा फोन घेतला. हा त्यांच्यासाठीही मोठा आश्चर्याचा धक्काच होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी त्यांना फोनवरुन धीर देत होते, या आजाराशी हिमतीने लढाल आणि पूर्णपणे बऱ्या व्हाल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फातमा लियाकत त्यावेळी काही बोलू शकल्या नाहीत, परंतु हात उचलून आपल्या मुलीकडे बघत त्यांनी या आजाराशी पूर्णपणे लढणार असल्याचं सांगितलं. पाच-सात मिनिटं पंतप्रधान त्यांच्याशी फोनवर बोलत होते. फोन ठेवण्यापूर्वी पंतप्रधानांनी रुबिका यांना काळजी न करण्याचं सांगत शक्त ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. रुबिका यांना पंतप्रधानांचा फोन आल्यानंतर, पंतप्रधान कार्यालयातून दररोज रुबिका यांना त्यांच्या आईची विचारपूस, तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन येत होते. आजाराशी लढण्यासाठी उत्तम सल्ला आणि सर्व औषधंही त्यांना देण्यात आली. एवढंच नाही, तर दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डायरेक्टर डॉक्टर रणदीप गुलेरिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ लिवर अँड बिलियरी सायंसेजचे डायरेक्टर डॉक्टर एस.के. सरीन हेदेखील उदयपूर रुग्णालयात भरती असलेल्या फातमा यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करत होते. उदयपूरचे डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करत होते, की एकीकडे इतके मोठे डॉक्टर त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कार्यालयही कोणत्याही प्रकारची औषधं पुरवण्यासाठी तयार होते. फातमा लियाकत यांच्यावर 26 दिवस जितके शक्य होते तिकते उपचार करण्यात आले. त्यांनी शेवटपर्यंत या आजाराशी शक्त तितका लढा दिला. परंतु 28 मे रोजी उदयपूरमधून दिल्ली आणण्यासाठी एअर अॅम्बुलन्सची तयारी सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. फातमा लियाकत यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबिय दु:खात असताना रुबिकाच नाही, तर त्यांच्या वडिलांनाही या गोष्टीने अतिशय मदत मिळाली, की या दु:खात देशाचे पंतप्रधान त्यांच्यासोबत होते. मुस्लीम मतांच्या राजकारणासाठी बनवली जातेय पंतप्रधान मोदींची चुकीची प्रतिमा, रुबिकाला आलाय वेगळाच अनुभव ही कहाणी आहे मुस्लीम समाजातील रुबिकाची. भारतातल्या इतर मुस्लिमांप्रमाणे त्यांचाही पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांना मुस्लिमांचा द्वेष असल्याचा ग्रह होता. मात्र, एका घटनेमुळं तो साफ बदलून गेला. रुबिकाचा मोदींसोबत आधीपासूनचा परिचय नव्हता. तिची 20 फेब्रुवारी 2019 ला पंतप्रधान मोदींची पहिल्यांदा समोरासमोर भेट झाली. सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सुलेमान यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनासाठी रुबिकाला आमंत्रित केलं होतं. तिच्या परिवाराशी मोदींची नव्यानं झालेली ओळख एवढ्यावरच संपली नाही. काही काळानंतर रुबिकाच्या कुटुंबाला एका मोठ्या संकटातून सामोरं जावं लागलं. या काळात नरेंद्र मोदी त्यांच्या परिवारासोबत ठामपणे उभे राहिले आणि त्यांची हर प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला. मागील दोन दशकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुस्लिमांमध्ये खलनायकाच्या रुपात दाखवण्यात येत आहे. मुस्लीम मतांचे राजकारण आणि या मतांची ठेकेदारी करू इच्छिणारे लोक देशातील कोट्यवधी मुस्लिमांना मोदींच्या नावावरून विनाकारण भीती घालत आहेत. हेच मोदी रुबिकाची आई फातमा लियाकत यांच्या आजारपणामुळं चिंतेत असलेल्या त्यांच्या परिवारासोबत ठामपणे उभे राहिले आणि त्यांना धीर देण्याचा आणि मदत करण्याचा सर्वप्रकारे प्रयत्न केला. रुबिकाच्या आईच्या मृत्यूनंतर मोदींनी लिहिलं पत्र रुबिका आणि तिच्या कुटुंबीयांसाठी मोदींचं हे रूप अगदीच नवीन होतं. मोदींविषयी त्यांना आधीच ऐकवण्यात आलेल्या कथा-कहाण्यांपेक्षा पूर्ण वेगळं होतं. मोदी त्यांच्यासाठी असं काही करतील याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. आईच्या आजारपणात मोदींकडून शक्य ते प्रयत्न झालेच. पण या दरम्यानच, फातमा लियाकत यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शोकसंदेश पाठवला होता. या संदेशात रुबिकाच्या आईविषयी विस्तारपूर्वक लिहिलं होतं. तसंच परिवारालाही धीर दिला होता. हे पत्र मिळताच रुबिकाच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांच्या दोन मुलींना सांगितलं की, आधी फोन येणं आणि नंतर पत्रही येणं ही बाब लियाकत परिवार कधीही विसरू शकणार नाही. मागील सात वर्षांपासून देशाचा कार्यभार सांभाळणाऱ्या पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अतिशय व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत एखाद्या कुटुंबासाठी इतकं काही करणं शक्य आहे, असा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. मोदींचं हे रूप रुबिका तिचे वडील आणि तिची छोटी बहीण या सर्वांसाठीच नवीन होतं. मोदींनी दिलेल्या या खास वागणुकीमुळे राजस्थानातल्या उदयपूर मधलं हे कुटुंब भारावून गेलं आहे. रूबिकानंही पंतप्रधान मोदींना धन्यवाद देताना पत्र लिहिलं आहे. या पत्रातला तिचा मजकूर पुरेसा बोलका आहे. 'माझी आई घरातली प्रमुख होती. जेव्हा देशाच्या प्रमुखांनी तिची जाणीव ठेवून तिच्याबाबत आत्मीयता दाखवली, तो क्षण आमच्या संपूर्ण परिवारासाठी खूप मोठा होता. इतक्या व्यग्र वेळापत्रकातून तुम्ही माझ्या आईसाठी वेळ काढलात.. असं घरातली एखादी ज्येष्ठ व्यक्तीच करू शकते.' गोंगाट न करता लोकांची मदत करणं मोदींचा जुना स्वभाव कठीण परिस्थितीमध्ये घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे वागण्याच्या मोदींच्या स्वभावाचा हा काही एकच किस्सा नाही. अशा शेकडो घटना आहेत, पण पंतप्रधान मोदींची माणुसकी आणि करुणामय रूप सार्वजनिक केलं तर आपण त्यांच्याप्रती जवळीक असल्याचं दाखवत आहोत, असं वाटेल म्हणून अनेक जण हे किस्से सार्वजनिक करत नाहीत. स्वत: पंतप्रधानांनीही या गोष्टी कधीच सार्वजनिक केल्या नाहीत. त्यांनी लोकांची मदत केली, कोणालाही न सांगता, पण मदत करणाऱ्यांसाठी मोदी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. असाच अनुभव वरिष्ठ पत्रकार आणि सध्या देशाचे सूचना आयुक्त म्हणून काम करणारे उदय माहूरकर यांना आला. माहूरकर आणि मोदी यांचं नातं जुनं आहे, जवळपास तीन दशकांपासून ते एकमेकांना ओळखतात. एप्रिल महिन्यात उदय माहूरकर यांची पत्नी स्मिता माहूरकर यांना कोरोनाची लागण झाली. महिन्याच्या सुरुवातीलाच स्मिता यांना कोरोनान ग्रासलं, त्यावेळी देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी व्हायला सुरुवात झाली. सामान्य परिस्थितीत शरिरात 95 च्या वर असणाऱ्या एसपीओ2 ची लेव्हल 55 पर्यंत खाली आली. एवढा कमी ऑक्सिजन असताना लोक कोमामध्ये जातात, तसंच त्यांचा मृत्यूचा धोका वाढतो. उदय माहूरकर यांनाही ही भीती वाटू लागली, त्यांना काहीच समजत नव्हतं, दिल्लीतल्या रुग्णालयांची स्थितीही गंभीर होती, कुठे जायचं? काय करायचं? या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वीय सहाय्यकाला याची माहिती दिली, पत्नीच्या गंभीर प्रकृतीविषयी त्यांना सांगण्यात आलं, यानंतर पंतप्रधान मोदींनाही याची लगेच माहिती मिळाली. मोदींनी वाचवलं उदय माहूरकर यांच्या पत्नीचा जीव पुढच्या पाच मिनिटांमध्ये उदय माहूरकर यांना पंतप्रधानांकडे माहिती दिल्याचा परिणाम दिसला, कारण आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे अधिक्षक एके सिंग राणा यांचा त्यांना फोन आला. 7 एप्रिलला स्मिता माहूरकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 19 दिवसांच्या उपचारानंतर 26 एप्रिलला त्या बऱ्या होऊन घरी परतल्या. त्यांच्यासाठी हे नवीन आयुष्य होतं. या काळात पंतप्रधान मोदींनी फोन करून दोन-तीनवेळा विचारपूस केली. त्यांच्या कार्यालयाचे अधिकारी वारंवार माहिती घेऊन पंतप्रधानांपर्यंत पोहोचवत होते. मागच्या वर्षी माहूरकर यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर काही तासांमध्येच पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन करून सांत्वन केलं. माहूरकर हा अनुभव कधीच विसरणार नाहीत, कारण पंतप्रधानांनी पाठवलेल्या शोक संदेशात त्यांचे वडील जेजी माहूरकर यांच्या व्यक्तीमत्वाबाबत उल्लेख करण्यात आला होता. माहूरकर यांनी मोदींच्या प्रशासकीय कामकाजाबाबत दोन पुस्तकं लिहिली आहेत. मोती बिंदू झालेल्या हजारो पशूंवर उपचार करण्यासोबतच दुसऱ्यांना मदत करण्याचे मोदींचे अनेक किस्से त्यांच्याकडे आहेत. कोरोनाच्या संकटकाळात मोदींनी शेकडो लोकांशी फोनवरून संवाद साधत त्यांची विचारपूस केली आहे. कोरोना साथीच्या दीड वर्षांच्या काळात अनेकांशी मोदींनी फोनवरून संवाद साधला आहे. विशेषत: अशा लोकांशी संवाद साधला, जे मोदींना कोणत्याही प्रकारे फायदा करून देऊ शकत नाहीत. राजकीयदृष्ट्या फायदा करून घेण्यासाठी मोदींना अशा लोकांना फोन करण्याची अजिबात आवश्यकता नाही. परंतु मोदींनी अनेक दशकांपूर्वी मानवी संबंध कसे अतूट असायचे, याची जाणीव लोकांना करून दिली आहे. त्यांनी कधी जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलेल्या जमशेदपूर येथील जनसंघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला फोन केला आहे. तर कधी संघ जीवनात सहकारी असणाऱ्या कोरोग्रस्त प्रचारकांशीही संवाद साधला आहे. एकट्या गुजरातमध्ये मोदींनी अनेक संघाच्या अधिकाऱ्यांशी आणि प्रचारकांची फोनवरून संवाद साधला आहे. त्यांची वेळोवेळी खुशहाली जाणून घेतली आहे. यामध्ये मसलन प्रवीणभाई ओतिया, मुकुंदराव देवभानकर, भागीरथभाई देसाई आणि हरीशभाऊ रावल आदींचा समावेश आहे. यामध्ये अशीही अनेक लोकं आहे, ज्यांच्यासोबत मोदींची वैचारीक मतभेद आहेत. पण अशा व्यक्ती अडचणीत असल्याचं समजल्यानंतर मोदींनी त्यांना थेट फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. फोनकरून केवळ सांत्वन करण्याऐवजी सर्वत्तोपरी मदत करण्याच आश्वासनही मोदींनी त्यांना दिलं आहे. मोदी आपल्या विरोधकांच्या आरोग्याचीही विचारपूस करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. असाच एक अनुभव गेल्यावर्षी दिल्लीतील एका ज्येष्ठ पत्रकारासोबत आला आहे. प्रस्थापितांच्या विरोधी ओळखल्या जाणार्‍या इंग्रजी वृत्तपत्राच्या स्थानिक संपादकाची भूमिका निभावणारा हा पत्रकार एका गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्यांच्या आजाराची बातमी एका सूत्रांकडून पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचली. तेव्हा अचानक एके दिवशी संबंधित पत्रकाराच्या फोनवर नो कॉलर आयडी वरून कॉल यायला सुरुवात झाली. पण आजारपणाने त्रस्त असलेल्या संबंधित पत्रकारानं फोन उचलला नाही. दरम्यान हॉस्पिटलमध्ये फेरफटका मारत असताना संबंधित पत्रकाराने शेवटी वैतागून फोन उचलला. तेव्हा समोरून आवाज आला की, तुमच्याशी पंतप्रधानांना बोलायचं आहे. या पत्रकारासाठी अशाप्रकारचा हा पहिलाच अनुभव होता. संबंधित पत्रकाराची 2014 नंतरच काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींशी भेट झाली होती. पण पंतप्रधानांनी यापूर्वी कधीही त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला नव्हता. असं असलं तरी, वैचारीकदृष्ट्या या दोघांमध्ये काहीही समानता नव्हती. खरंतर या पत्रकाराने स्वतः मोदींवर टीका करणाऱ्या मोठं-मोठ्या बातम्या केल्या होत्या. अशात मोंदीनी फोन केल्यानं हैराण झालेल्या पत्रकाराला आपल्यासोबत काय घडत आहे, हेही समजत नव्हतं. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रकृतीची प्रेमाने विचारपूस केली. त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास मदत करण्याचं आश्वासनही मोदींकडून देण्यात आलं. पत्रकाराचे प्राण वाचविण्यासाठी पाठवलं थेट सरकारी विमान अहमदाबाद, 13 जून: गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील पत्रकार निर्णय कपूर यांच्यासोबत 2004 साली असं काही घडलं होतं की त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांच्या एका निर्णयामुळे निर्णय कपूर यांचे प्राण वाचले, त्यामुळे तो दिवस ते आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीत. झालं असं होतं की, 20 जानेवारी 2004 साली निर्णय कपूर हे जिल्हा मुख्यालय भुज येथे आपले कॅमरामन उमेश चौहाण यांच्यासोबत रिपोर्टिंग करण्यासाठी दाखल झाले. 26 जानेवारी 2001 रोजी कच्छ मध्ये मोठा भूकंप आला होता आणि त्या घटनेनंतर तीन वर्षांतील तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याचं कव्हरेज करण्यासाठी ते तेथे दाखल झाले होते. टीव्ही चॅनलसाठी एक स्पेशल रिपोर्ट बनवण्यापूर्वीच अचानक त्यांच्या छातीत दुखण्यास सुरूवात झाली. निर्णय कपूर यांना आणखीनच त्रास होऊ लागला. तात्काळ अहमदाबाद येथे त्यांनी आपल्या डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी त्यांना भुज येथील एका डॉक्टरांकडे जाण्यास सांगितले. निर्णय कपूर हे डॉक्टरांपर्यंत पोहोचतील तोपर्यंत परिस्थिती आणखीनच खराब झाली होती. भुज येथील डॉक्टरांना लक्षात आले की हा हार्ट अटॅक होता. त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरू केला. भुजमध्ये यापुढील उपचार शक्य नव्हतं. त्याच दरम्यान दिल्ली असाईन्मेंटचा फोन आला आणि घडलेला संपूर्ण प्रकार कॅमेरामनने त्यांना सांगितला. मग दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांना घटनेची माहिती देण्यात आली. रजत शर्मा यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत जुनी ओळख होती. त्यांनी निर्णय कपूर यांच्या परिस्थिती लक्षात घेता तात्काळ नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली. नरेंद्र मोदी यांनीही वेळ न घालवता तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं. रजत शर्मा यांचा फोन ठेवून नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिले आणि अहमदाबादमधील स्टर्लिंग रुग्णालयातून तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम आवश्यक मेडिकल वस्तूंसह एअरपोर्टवर पाठवण्यात आली. यासोबतच राज्य सरकारचं विमान सुद्धा भुजच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी तयार करण्याचे आदेश मोदींनी दिले होते. डॉक्टरांची टीम विमानतळावर पोहोचताच विमानाने भुजच्या दिशेने उड्डाण केले. तर तिकडे कच्छमधील अधिकारी विमानतळावर डॉक्टरांच्या पथकाची वाट पाहत होते. भुज येथील रुग्णालयाने निर्णय कपूर यांना राज्य सरकारच्या विशेष विमानात शिफ्ट करण्यात आलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली अहमदाबाद विमानतळावर निर्णय यांना आणण्यात आले मग उपचारासाठी स्टर्लिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तात्काळ ऑपरेशन करण्यात आलं आणि निर्णय कपूर यांचे प्राण वाचले. रुग्णालयात उपचारानंतर बरे झाल्यावर निर्णय यांना मोदींचा फोन आणि कसं घडलं याची माहिती मागवली. निर्णय यांच्या मते अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यावेळी मोदींनी त्यांना सांगितलं अचानक असं काही होत नाही आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. परिवाराला तुमची आवश्यकता आहे. निर्णय 17 वर्षांनंतरही तो घडलेला किस्सा विसरलेले नाहीयेत. जर मोदींनी आवश्यक ती मदत केली नसती तर त्यांचे प्राण वाचले नसते. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी मीडिया ज्या पद्धतीने मोदींवच टीका करत होती तेच मोदी एखाद्या पत्रकाराचे प्राण वाचवण्यासाठी असा निर्णय घेऊ शकतात असं कुणी विचारही नाही करू शकत. कठोर मोदींची संवेदनशीलता पंतप्रधान मोदींनी त्या पत्रकाराला दोन वेळा फोन केला. मोदींच्या राजकीय निर्णयांवर त्यानं यापूर्वी अनेकदा टीका केली आहे. पण इतकी टीका करुनही त्याला कळलं नाही की मोदींनी त्याला फोन करण्यासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून कसा वेळ काढला. आजवर भारताच्या पंतप्रधानानं कुठल्याच पत्रकाराला स्वार्थ असल्याशिवाय फोन केलेला नाही. या पत्रकाराच्या आयुष्यातही पंतप्रधानांद्वारे आलेला हा पहिलाच फोन होता. मोदींच्या या फोनमुळं त्याला आजाराशी लढण्याची प्रेरणा मिळाली. त्याला खूप चांगलं वाटत होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकीकडे मोदी पत्रकारांना भाव देत नाहीत असं चित्र रंगवलं जातं. पण दुसरीकडे ते एका पत्रकाराला त्याच्या दु:खाच्या काळात प्रेरणा देण्यासाठी त्याला फोन करतात. मोदींनी आज केवळ देशातच नाही तर जगाच्या राजकारणात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळं त्याच्यासारख्या पत्रकाराला प्रभावित करण्याची गरज त्यांना भासणार नाही. मग त्यांनी फोन का केला याचंच त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. देशभरातात असे अनेक पत्रकार आहेत ज्यांना मोदींनी मदत केली आहे. त्यापैकी एक वरिष्ठ पत्रकारानं त्याच्या आयुष्यातील असाच एक थक्क करणारा अनुभव सांगितला. आज ते एका महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळं त्यांना स्वत:चं नाव जाहिर करायचं नाही. पण ते म्हणाले, त्यांची पत्नी आजारी असताना मोदींनी त्यांना बंगळुरूमधील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान या ठिकाणी उपचार करण्याचा सल्ला दिला होता. तिथे जगभरातील लोक योग और नेचुरोपॅथीद्वारे उपचार घेण्यासाठी येतात. मी तिथं माझ्या पत्नीला घेऊन पोहोचण्यापूर्वीच आमची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. मोदींनी तसे आदेशच दिले होते. ती व्यवस्था पाहून पत्रकार देखील आश्चर्यचकित झाला. त्या ठिकाणी माझ्या पत्नीसारखे अनेक आजारी लोक उपचार घेण्यासाठी आले होते. यापैकी अनेकांना स्वत: मोदींनी तिथे पाठवले होते. तिथे पत्रकार एका गरीब मुलाला भेटला हा मुलगा गुजरातमधून आला होता. मोदींनी त्याच्या उपचारांचा खर्च स्वत: उचलला होता. या मुलाचा उपचार करुन मोदींना कुठलाच फायदा होणार नव्हता तरी देखील त्यांनी त्याची मदत केली. विरोधक कायमच त्यांच्या कठोर, राजकीय व्यक्तिमत्वावर टीका करतात. परंतु त्यांना माहित नाही की ते शांतपणे कुठल्याही प्रकाराची जाहिरातबाजी न करता लोकांची मदत करण्यावर विश्वास ठेवतात. संकटात सापडलेल्यांना मदत करणे ही मोदींची सर्वात मोठी प्राथमिकता मोदींच्या व्यक्तिमत्वातील या खास पैलूचा अंदाज मला 2004 मध्ये आला होता. मार्च महिन्यातील शेवटचा दिवस होता. एक दिवसापूर्वी म्हणजेच 30 मार्च रोजी तत्कालीन उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांची 'भारत उदय यात्रा' राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मस्थळ पोरबंदरपासून सुरू झाली होती. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आडवाणींचा गुजरातमध्ये शेवटचा कार्यक्रम साबरकांठा जिल्ह्यातील मुख्यालय हिम्मतनगरमध्ये होता. ते उन्हाळ्याचे दिवस होते. सलग दोन दिवस कडक उन्हात प्रवासाचे कव्हरेज करताना मला त्रास जाणवू लागला होता. आडवाणींचा प्रवास हिम्मतनगरला पोहोचण्यापूर्वीच मी तेथे पोहोचलो होता. येथून कार्यक्रम कव्हर करून अहमदाबादला परत जाईन असा विचार करून मी हिम्मतनगरला पोहोचलो होतो. परंतु हिम्मतनगरमध्ये आडवाणींची सभा सुरू होण्यापूर्वीच माझी तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली. 31 मार्च, 2004 च्या संध्याकाळी मला तीव्र तापासोबत उलट्यांचा त्रास सुरू झाला. माझं शरीर थरथर कापू लागलं. सोबत असलेले कॅमेरामॅन राममणि पांडे यांनी जवळच्या एका लॉजमधील खोली उघडण्यास सांगितली. मी आलो आणि पलंगावर आडवा झालो. माझी प्रकृती दिवसेंदिवस खराब होत होती. ताप, उलट्यामुळे खूप त्रास होत होता. अशक्तपणाबरोबरच शुद्धही हरपत होती. त्याचवेळी नरेंद्र मोदींचे पीए ओमप्रकाश यांचा फोन आला. टीव्ही पत्रकारांचे जग त्यावेळी खूपच लहान असायचे, तिथे ठराविक वाहिन्या आणि काही पत्रकार उपस्थित होते. ओमप्रकाश मला म्हणाले की, 'हिम्मतनगरच्या सभेत दिसला नाहीत, म्हणून प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी फोन केला.' त्यावेळी मला नीट बोलताही येत नव्हतं. मी त्यांना म्हणालो की, 'माझी तब्येत ठीक नाहीये. खूप ताप आहे.' हे ऐकताच ओमप्रकाश यांनी तातडीने मोदींना याची सूचना दिली. त्यावेळी मोदी हिम्मतनगरमध्ये आडवणींसोबत होते. मोदींनी फोन घेतला आणि माझ्या प्रकृतीबद्दल विचारलं. म्हणाले, 'घाबरू नका, काही होणार नाही. मी व्यवस्था करतो.' मोदींशी बातचीत झाल्यानंतर माझी प्रकृती अधिक बिघडली. माझी शुद्ध हरपत चालली होती. पुढे काय करावं, याबद्दल माझे सहकारी कॅमेरामन विचार करीत होते. यादरम्यान खोलीत काहीजणं आले. मला अंधुक आठवतंय की, काही जण जबरदस्ती मला खांद्यावर उचलनू घेऊन जात होते, आणि मी विरोध करीत होतो. शेवटी रात्री 3 वाजता मला जाग आली. तेव्हा मी एका रुग्णालयातील खाटेवर होतो. यावेळी नर्सने सांगितलं की, तुम्हाला रात्री साधारण 10 च्या सुमारास येथे आणण्यात आलं. तुमची प्रकृती खराब होती. वेळेवर उपचार केला नसता तर डिहायड्रेशनमुळे विपरित घडलं असतं. मी पाहिलं तेव्हा माझ्या एका बाजूला ग्लुकोज चढवलं होतं. सकाळी डॉक्टर आले, त्यांनी मला तपासलं. आणि काही दिवस येथेच आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र मी हट्टाने त्यांना डिस्चार्ज द्यायला सांगितलं.' पुन्हा उन्हाचा त्रास झाला तर तुम्ही वाचू शकणार नाही. त्यामुळे घरीच राहा,' अहमदाबादमधून निघताना डॉक्टरांनी मला बजावलं होतं. यानंतर मी घरी गेलो आणि पत्नीला या सर्व घटनेबाबत सांगितलं. सन 2010 पर्यंत मी ही घटना विसरलो होतो. इशरत जहां चकमक प्रकरणात सीबीआयने आरोपी केल्यावर तत्कालीन गुजरातचे गृह राज्यमंत्री अमित शहा यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले प्रफुल्ल पटेल यांना मोदींनी त्यांचे गृह राज्यमंत्री केले होते, जे सध्या तीन केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासक आहे. 2010 मध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. मी त्यांना औपचारिकतेच्या नात्याने सांगितलं की, 'तुमची कधी भेट झाली नाही, वेळ काढून तुम्हाला भेटायला येईन'. मात्र याचवेळी लिफ्टमध्ये प्रवेश करताना प्रफुल्लभाई म्हणाले की, 'मी तर तुम्हाला 6 वर्षांपूर्वी भेटलो आहे. मी तुम्हाला चांगलं ओळखतो.' मला जरा आश्चर्यचं वाटलं, माझ्या स्मरणशक्तीवर मला विश्वास आहे. मात्र यांची भेट कधी झाली याचा विचार करू लागतो. यावेळी त्यांनी सांगितलं की, '31 मार्च 2004 च्या त्या सायंकाळी नरेंद्र मोदींनी हिम्मतनगरमध्ये आडवाणींच्या सभेची व्यवस्था करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांना सर्व सोडून तत्काळ मला शोधून रुग्णालयात दाखल करण्याचा व योग्य उपचार करण्याचा आदेश दिला होता.' मोदींच्या सूचनेवरून प्रफुल्ल पटेल मला रुग्णालयात दाखल करवून घेण्यासाठी आले होते प्रफुल्ल पटेल त्यावेळच्या हिम्मतनगर या छोट्याशा गावात माझा शोध घेत होते. शोधत शोधत ते लॉजच्या रूममध्ये पोहोचले होते. मी विरोध करीत असतानाही मला खांद्यावर घेऊन पायर्‍यावरून खाली उतरवून रुग्णालयात नेलं होतं. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रफुल्लभाई रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या शेजारीच बसले होते आणि जेव्हा माझ्यावरील धोका कमी झाला, तेव्हा मोदींना माझ्या प्रकृतीची माहिती देऊन ते त्या रात्री घरी परतले. त्यावेळी दिसलेल्या मोदींमधील या पैलूवर सार्वजनिकरित्या मी कधीच चर्चा केली नाही. तेव्हा असं केलं असतं तर कदाचित हा मोदींसाठीचा प्रोपोगंडा ठरला असता. आता कदाचित मोदी ज्या उंचीवर पोहोचले आहेत, तेथे अशा सर्व कथा सार्वजनिक केल्या किंवा नाही तरी त्यांना यामुळे फार फरत पडत नाही. परंतु कोट्यवधी देशवासीयांना मोदींच्या त्या पैलूची ओळख करून घेण्यास मदत होऊ शकेल हे मात्र नक्की. येथे ते एक आक्रमक राजकारणी नाही, परंतु संकटात सापडलेल्यांसाठी समस्यानिवारक आहेत, त्यांना धैर्य देत आहेत, सर्व प्रकारची मदत करत आहेत. देशाला मोदींचा हा पैलू माहित असायला हवा आणि म्हणूनच हे निवडलेले काही प्रसंग सत्य घटनेचा आरसा आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Narendra modi

पुढील बातम्या