मराठी बातम्या /बातम्या /देश /महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात ‘ऑपरेशन लोटस’? भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात ‘ऑपरेशन लोटस’? भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात ‘ऑपरेशन लोटस’?

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात ‘ऑपरेशन लोटस’?

Operation Lotus in Himachal: हिमाचलमध्ये विधानसभेच्या 68 जागा आहेत, त्यापैकी काँग्रेसने 40, तर भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत. हिमाचलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 35 आमदारांची गरज आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Shimla, India

शिमला, 1 जानेवारी : महाराष्ट्रात संत्तातर घडवल्यानंतर आणखी एका काँग्रेसशासित राज्यात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू झाल्याच्या चर्चा आहेत. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन 20 दिवस झाले आहेत. सीएम सुखविंदर सिंग आणि डेप्युटी सीएम मुकेश अग्निहोत्री यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारला. परंतु, अद्याप मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्याचवेळी मंडी जिल्ह्यातील बाल्ह विधानसभेतील भाजप आमदार इंदर सिंग गांधी यांनी दावा केला आहे की जयराम ठाकूर राज्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी पलटवार केला आहे. यापूर्वी भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या विक्रम सिंह यांनीही 'ऑपरेशन लोटस' संदर्भात पोस्ट टाकली होती. मात्र, नंतर त्यांनी त्यांची पोस्ट एडीट केली होती.

प्रत्यक्षात भाजप आमदार इंद्र सिंग गांधी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ऑपरेशन लोटस सुरू झाले असून काँग्रेसलाही याची जाणीव आहे. मला जेवढे माहीत आहे तेवढी देत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच काँग्रेसचे 18 आमदार बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत बसलेल्या नेत्यांना याची अधिक माहिती आहे. भाजपने काँग्रेसचे आमदार पळवले आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले, कदाचित.

विक्रम सिंह यांनीही पोस्ट केली होती

नुकतीच भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले विक्रम सिंह यांनीही फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'काँग्रेस सरकार आमच्या दबावाखाली नाही तर स्वतःच्या वजनाने पडेल...@ऑपरेशन लॉट्स. मात्र, नंतर त्यांनी आपली पोस्ट एडीट करून ऑपरेशन लोटस काढले.

वाचा - राहुल गांधींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, दिल्ली पोलीस म्हणाले..

काँग्रेस आमदाराचे प्रत्युत्तर

सिरमौर जिल्ह्यातील नाहान येथील काँग्रेसचे आमदार अजय सोलंकी यांनी भाजप आमदाराच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपचे ऑपरेशन लोटसचे स्वप्न अधुरे राहणार असल्याचे सांगितले. अजय सोलंकी म्हणाले की, भाजप ऑपरेशन लोटसबाबत भ्रामक प्रचार करत आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. तसेच आमदारांच्या बेपत्ता होण्यावर ते म्हणाले की, सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात स्वतंत्रपणे काम करत आहेत. याआधी काँग्रेस नेते कौल सिंह यांनीही मंडीमध्ये इंदरसिंग गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

काँग्रेसकडे बहुमत

हिमाचलमध्ये विधानसभेच्या 68 जागा आहेत, त्यापैकी काँग्रेसने 40, तर भाजपच्या आमदारांनी 25 जागा जिंकल्या आहेत. तीन अपक्षही विजयी होऊन विधानसभेत पोहोचले आहेत. हिमाचलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 35 आमदारांची गरज आहे.

First published:

Tags: BJP, Himachal pradesh, Rahul gandhi