कोलकाता, 2 फेब्रुवारी : कोरोनाच्या (corona) जागतिक साथीमध्ये (pandemic) आजवर असंख्य लोकांचे बळी गेले आहेत. अजूनही हे मरणसत्र थांबलेलं नाही. अनेकांनी या महासाथीत आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचं गमावलं. या प्रियजनांना श्रद्धांजली (tribute) वाहण्यासाठी आता एक मंच उपलब्ध केला गेला आहे. तोही ऑनलाइन. सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आकाराला आलं आहे.
शब्दांतून श्रद्धांजली वाहण्यासाठी बनवलेला हा मंच ऑनलाईन स्वरूपातला (online platform) आहे. या मंचाचं नाव आहे नॅशनल कोविड मेमोरियल nationalcovidmemorial.in असं त्या संकेतस्थळाचं (website) नाव आहे. 30 जानेवारीला सगळ्यांसाठी उपलब्ध केलेलं हे संकेतस्थळ अनेक भावपूर्ण आठवणींनी भरून गेलेलं दिसतं आहे. अनेकांनी आपले कुटुंबीय आणि मित्रांना (family and friends) या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतात आजवर 1 लाख 54 हजार लोकांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात नव्या संसर्गात लक्षणीय घट झालेली दिसते. हे संकेतस्थळ काही सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आकाराला आलं आहे. कोलकात्यामधील डॉक्टरांच्या टीमनं या कामात पुढाकार घेतला. अनेकांनी यावर श्रद्धांजली वाहण्यास सुरवात केली आहे. व्यक्तीनं आपला फोन नंबर आणि संबंधित व्यक्तीचा मृत्यू दाखला इथं देणं अपेक्षित आहे.
या टीममधले अभिजित चौधरी सांगतात, की नॅशनल कोविड मेमोरियल हा एक लहानसा प्रयोग आहे. भारतीयांना यामाध्यमातून आपल्या प्रियजनांच्या स्मृती जतन करून ठेवता येतील. कोरोनाकाळात ज्यांचे जीव गेले त्यांना अखेरचा निरोप नीट देणं कुटुंबियांना शक्य झालं नाही. अगदी अंत्यदर्शनही घेता आलं नाही. अशावेळी निदान मृत्यूनंतर तरी थोडी प्रतिष्ठा (dignity) या व्यक्तींना मिळाली पाहिजे.
हे वाचा - Sputnik V किती प्रभावी आणि सुरक्षित? तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जारी
'हिंदू ग्रुप ऑफ पब्लिकेशन्स'चे संचालक एन. राम म्हणाले, की याकामात स्वयंसेवक, एनजीओज (NGO) आणि पत्रकारांनी (journalists) गरीब आणि वंचित लोकांकडून आवर्जून श्रद्धांजलीचे शब्द गोळा केले पाहिजेत. हे मेमोरियल अर्थात स्मृतिस्थळ सर्वसमावेशक झालं पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid19, Kolkata, Website