नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : जगात सर्वात पहिली लाँच करण्यात आलेली कोरोना लस (corona vaccine) म्हणजे Sputnik V. रशियानं (russia) तयार केलेली ही लस. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधी ही लस लाँच करण्यात आली. त्यानंतर लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. वादग्रस्त ठरलेली ही लसच आता 100 टक्के प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.
स्पुतिनक V लशीचा तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जारी करण्यात आला आहे. The Lancet मध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही लस एकंदर 91.6% प्रभावी आणि गंभीर रुग्णांसाठी 100% टक्के प्रभावी आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय कोणतेही गंभीर दुष्परिणामही दिसले नसल्याचे सांगण्यात आलं आहे.
BREAKING:#SputnikV phase 3 clinical trials results in @TheLancet. Its 91.6% efficacy overall & 100% for severe cases have been validated by internationally peer reviewed data. With logistics at +2 +8C and <$10/shot, Sputnik V is a vaccine for all humankind.https://t.co/Fk5CHHkqIv
— Sputnik V (@sputnikvaccine) February 2, 2021
मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे. रशियाची ही पहिली लस एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला.
ही लस भारतात लवकरात लवकर लाँच होणार आहे. स्पुतनिक V (Sputnik V) लशीसाठी हैदराबादमधील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं (Dr Reddys Laboratories) रशियासोबत करार केला आहे. मार्च, 2021 मध्येच ही लस भारतात लाँच होण्याची आशा कंपनीला आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus