मराठी बातम्या /बातम्या /देश /

दुःखाचा डोंगर! बाराव्या मजल्यावरून पडलं 1 वर्षांचं बाळ, वाढदिवशीच गेलं देवाघरी

दुःखाचा डोंगर! बाराव्या मजल्यावरून पडलं 1 वर्षांचं बाळ, वाढदिवशीच गेलं देवाघरी

आईवडिल (parents) आणि घरच्यांचं (relatives) लक्ष नसताना दारातून रांगत रांगत बाहेर आलेलं बाळ (baby) बाराव्या मजल्यावरून खाली कोसळलं.

आईवडिल (parents) आणि घरच्यांचं (relatives) लक्ष नसताना दारातून रांगत रांगत बाहेर आलेलं बाळ (baby) बाराव्या मजल्यावरून खाली कोसळलं.

आईवडिल (parents) आणि घरच्यांचं (relatives) लक्ष नसताना दारातून रांगत रांगत बाहेर आलेलं बाळ (baby) बाराव्या मजल्यावरून खाली कोसळलं.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : आईवडिल (parents) आणि घरच्यांचं (relatives) लक्ष नसताना दारातून रांगत रांगत बाहेर आलेलं बाळ (baby) बाराव्या मजल्यावरून खाली कोसळलं. (collapsed from 12th floor) या दुर्घटनेत बाळाचा जीव (death) गेला. या घटनेमुळे बाळाच्या आईवडिलांवर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.

अशी घडली दुर्घटना

ही घटना घडलीय दिल्लीच्या नोएडामधील (Noida) कासना ग्रीन वन हाऊसिंग सोसायटीमध्ये. या इमारतीत बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाला 1 वर्षांचा मुलगा होता. नेहमी घरात खेळणारा हा मुलगा नेमका सर्वांचा डोळा चुकवून घराच्या बाहेर पडला. रांगत रांगत तो कधी गेटच्या बाहेर गेला, हे कुणालाच समजलं नाही. बाहेर गेल्यानंतर जिन्यापाशी लावलेल्या रेलिंगमधून तो पलिकडे गेला आणि क्षणार्धात बाराव्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर जाऊन पडला. गेटच्या बाहेरही त्यावेळी कुणी नसल्यामुळे बाळाच्या जिवाला धोका असल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही. जेव्हा बाळ कोसळल्याचं समजलं, तेव्हा फार उशीर झाला होता.

हे वाचा -घरातून येत होती दुर्गेंधी, पोलिसांनी दार उघडून पाहिले आणि...

बाळाचा होता पहिला वाढदिवस

ही घटना घडली, त्या दिवशी बाळाचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे या कुटुंबाचे नातेवाईक, मित्र, शेजारी अशी काही निवडक मंडळी घरात जमली होती. अनेकजण एकत्र आल्यामुळे सगळेच गप्पांमध्ये रमले होते. तर बाळाचे आईवडिल कार्यक्रमाच्या आणि पाहुणचाराच्या गडबडीत होते. या सगळ्यात बाळाकडे काही क्षणांसाठी सर्वांचंच दुर्लक्ष झालं. घराच्या हॉलमध्ये खेळणारं आणि इकडे तिकडे रांगणारं बाळ उघड्या दारातून आणि गेटमधून बाहेर कधी पडलं, ते कुणालाच कळलं नाही. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 1 वर्षांचं बाळ आणि तेदेखील त्याच्या वाढदिवशीच दगावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Baby died, Delhi