मराठी बातम्या /बातम्या /देश /

Jammu Kashmir: शोपियानमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश

Jammu Kashmir: शोपियानमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश

रावलपोरा परिसरात भारतीय सुरक्षा दल (Indian Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) शनिवारी चकमक झाली. परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपलेले होते. यातील एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

श्रीनगर 14 मार्च : जम्मू काश्मिरच्या (Jammu Kashmir) शोपियान (Shopian) जिल्ह्यातील रावलपोरा परिसरात भारतीय सुरक्षा दल (Indian Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) शनिवारी चकमक झाली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपलेले होते. यातील एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं आहे. अजूनही परिसरात गोळीबारचा आवाज येत असून स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं गेलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाला गुप्त माहिती मिळाली होती, की काही दहशतवादी शोपियाच्या रावलपोरा भागात लपलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीनं परिसर घेरला. यानंतर घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं, मात्र त्यांनी गोळीबार सुरुच ठेवला. रात्रीच्यावेळी सुरु असलेल्या या गोळीबाराच्या आवाजावरुन हा अंदाज लावला गेला, की परिसरात दोन ते तीन दहशतवादी असू शकतात.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. अजूनही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. सकाळी लवकरपासूनच लोकांना घराबाहेर न पडण्याचं आणि घराची दारं तसंच खिडक्या बंद करण्याचं आवाहन केलं गेलं आहे.

जम्मू काश्मिरमधील शोपियान जिल्ह्यातून दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनसह जोडल्या गेलेल्या सात जणांनी अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी ट्वीट करत सांगितलं, की दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनसाठी काम करणाऱ्या ७ जणांना शोपियान पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांकडून आपत्तीजनक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Death, India, Jammu and kashmir