काश्मीरमध्ये पुन्हा IEDचा स्फोट; मेजर शहीद, सर्च ऑपरेशन जारी

काश्मीरमध्ये पुन्हा IEDचा स्फोट; मेजर शहीद, सर्च ऑपरेशन जारी

शनिवारी संध्याकाळी एलओसीजवळ पेट्रोलिंग पार्टीजवळ हा स्फोट झाला आहे.

  • Share this:

जम्मू काश्मीर, 16 फेब्रुवारी : संपूर्ण देशाला हादरवून ठेवणाऱ्या पुलवामा हल्ल्यामध्ये 42 जवान शहीद झाल्याच्या 2 दिवसानंतरच एलओसीच्या राजौरीमध्ये आणखी एक आयईडी ब्लास्ट झाला आहे. या स्फोटामध्ये सैन्यातील एक अधिकारी शहीद झाले आहेत.

शनिवारी संध्याकाळी एलओसीजवळ पेट्रोलिंग पार्टीजवळ हा स्फोट झाला आहे. पण अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पण नेमका हा स्फोट कसा झाला याचा आता तपास सुरू आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांकडून आत्मघातली हल्ल्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानकडून पुंछमध्ये एलओसीजवळ सीजफायरचं उल्लंघन केलं. यावर भारताने त्यांना सडेतोड उत्तर दिलं. पण दरम्यान, जम्मूमध्ये वारंवार होणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील- PM मोदी

भारताच्या फाळणीनंतर जन्माला आलेला पाकिस्तान हा देश म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यातील भारताच्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे.

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा जनतेमधील आक्रोश मी समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास ठेवा. शहीदांचे बलिदान वाया जाणार नाही. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ज्यांनी हा हल्ला केला द्यांना जरूर शिक्षा दिली जाईल, असे देखील मोदींनी सांगितले.

'मुस्लिम बटालियन तयार करा आणि सीमेवर पाठवा'

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील नागरिकांनी अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळला आहे.

काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी नागरिक करत आहेत. अशातच केंद्र सरकारने मुस्लिम बटालियन तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

'ठोकून काढा! मोदीजी विरोधकांवरचे हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे बघा'

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला ठोकून काढा म्हणत या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शिवसेनेने सामनामधून केली आहे.

पुलवामा हल्ल्यात 37 जवानांना वीरमरण आले. ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर जवान आणि शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा राहण्याची वेळ असल्याचे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. मोदींनी पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवून पाकिस्तानवरील हल्ल्यांकडे पहावे असेही अग्रलेखात म्हटले आहे.

VIDEO : 'पप्पांनी सांगितलं, समोरच्या गाडीसमोर स्फोट झाला', जवानाच्या मुलाचा फोन काॅल!

First published: February 16, 2019, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading