भारतातील नवी दिल्ली, तेलंगाणा आणि राजस्थानमध्ये सोमवारी कोरोनाव्हायरसचे एकूण 3 रुग्ण सापडले. जयपूरमध्ये इटलीतील पर्यटकाच्या रक्ताच्या नमुन्याचा मंगळवारी पुण्याहून आलेला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आता त्याच्या पत्नीचा एसएमएस रुग्णालयातील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या रक्ताचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आलेत. कोरोनाव्हायरग्रस्त इटालियन नागरिकांना रुग्णालयात आइसोलेशन वार्डमध्ये (Isolation ward) ठेण्यात आलं आहे. संबंधित - 'कोरोना'शी लढ्याचं 'केरळ मॉडेल', भारतातील पहिले 3 रुग्ण असे झाले व्हायरसमुक्त रुग्णालयापासून 3 किलोमीटरचा परिसर संसर्गाचा धोका असलेला परिसर (containment zone) म्हणून घोषित करण्यात आला. आरोग्य अधिकारी या परिसरातील घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करणार आहेत. दिल्लीतील इटालियन नागरिकांना ITBP कॅम्पमध्ये पाठवलं उत्तर प्रदेशच्या आग्र्यात कोरोना व्हायरसचे 6 संशयित रुग्ण आहेत, तर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये 24 संशयित रुग्ण आढळून आलेत. यामध्ये 21 इटालियन नागरिक आणि 3 भारतीयांचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसताच त्यांना तात्काळ भारत-तिबेट सीमा पोलीसच्या (ITBP) कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं आहे.Army officer admitted to isolation ward of military hospital at Mhow in Madhya Pradesh for suspected exposure to #coronavirus after returning from Iran: Official. #COVID19
— Press Trust of India (@PTI_News) March 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Army, Coronavirus