हरिद्वार, 23 जून : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनावर सर्वच देश लस शोधत आहे. परंतु, पतंजलीने कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधून काढले आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाची घोषणा केली आहे. यामध्ये सात दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
हरिद्वारमध्ये बाबा रामदेव ,आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीकडून कोरोनिल औषध तयार करण्यात आले असून ते कशा प्रकार काम करले याची माहिती दिली आहे. तसंच हे औषध कशा प्रकार तयार करण्यात आले याची माहितीही बाबा रामदेव यांनी दिली.
कोरोनिल औषध तयार करण्यासाठी दोन प्रकार उपचार केला. क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या पद्धतीचा वापर केला असल्याचं रामदेव यांनी सांगितलं.
क्लिनिकल कंट्रोल स्टडीसाठी दिल्ली, मेरठसह देशातील इतर भागात अनेक रुग्णांवर प्रयोग केले. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला.
त्यानंतर क्लिनिकल कंट्रोल ट्राय चा वापर केला. यामध्ये पंतजली रिसर्ज सेंटर आणि नॅशनल मेडिकल इन्स्टिट्युट सायन्स निम्स यांच्या संयुक्त विद्यमानाने 100 लोकांवर उपचार करण्यात आले. यात 95 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता.
यात 69 टक्के रुग्ण हे फक्त 3 दिवसांमध्ये बरे झाले आहे. जे रुग्ण कोरोनाबाधित होते, त्याचे रिपोर्ट हे 3 दिवसांनी निगेटिव्ह आले आहे. एवढेच नाहीतर सात दिवसांमध्ये रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.
क्लिनिकल कंट्रोल ट्रायल करण्यासाठी सीटीआरची परवानगी घेण्यात आली होती. यामध्ये ज्या रुग्णांना कोरोनिल देण्यात आले नव्हते. त्यांच्यामध्ये कोणतेही बदल झाले नव्हते. यामध्ये शंभर टक्के प्रकृती सुधारण्याचा दर असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
हर्बल औषधाचे नाव हे कोरोनिल असणार आहे. हे औषध आयुर्वैदिक साधनापासून तयार करण्यात आले आहे. या औषधाचे सेवन केल्यानंतर 4 ते 5 दिवसात फरक पाहण्यास मिळणार आहे. पतंजलीच्या रिसर्च सेंटरकडून 280 रुग्णांवर प्रयोग करण्यात आला होता. यात सात दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण हे बरे झाले होते. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली.
कोरोनिल औषध हे सकाळी आणि संध्याकाळी एकदा घ्यावे लागणार आहे. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सिन कनव्हर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते, असंही रामदेव यांनी सांगितलं.
या पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांच्यासह आचार्य बालकृष्ण, औषधी चाचणीस उपस्थित असलेले वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरही उपस्थित होते. या आयुर्वेदिक औषधावर संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे केलं आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.