मराठी बातम्या /बातम्या /देश /

Kurkure : कुरकुरे आणि मिक्सचर खाल्ल्याने घडली 'ही' विपरीत घटना, चार मुलींपैकी एकाचा...

Kurkure : कुरकुरे आणि मिक्सचर खाल्ल्याने घडली 'ही' विपरीत घटना, चार मुलींपैकी एकाचा...

रात्र झाल्यामुळे दोघांना झोप येत असेल, असे त्यांच्या घरच्यांना वाटले. यानंतर त्या दोन्ही मुलींना झोपवून घरातील लोकही झोपून गेले.

रात्र झाल्यामुळे दोघांना झोप येत असेल, असे त्यांच्या घरच्यांना वाटले. यानंतर त्या दोन्ही मुलींना झोपवून घरातील लोकही झोपून गेले.

रात्र झाल्यामुळे दोघांना झोप येत असेल, असे त्यांच्या घरच्यांना वाटले. यानंतर त्या दोन्ही मुलींना झोपवून घरातील लोकही झोपून गेले.

  • Published by:  News18 Desk

लातेहार (झारखंड), 6 जून : लातेहारमधील 4 मुलींना पॅकेट बंद मिक्सचर आणि रिंग्स कुरकुरीत खाल्ल्याने विषबाधा (Food Poisonings) झाल्याची घटना समोर आली आहे. यातील एका मुलीचा मृत्यू (Girl Death Food Poisoning) झाला आहे. तर इतर तीन जणांवर उपचार सुरू आहे. या घटनेनंतर चंदवा सामुदायिक आरोग्य केंद्राच्या (Community Health Centre) पथकाने गावातील दुकानात जाऊन विकल्या जाणाऱ्या मिक्सचर आणि रिंग्स कुरकुऱ्यांचा नमुना घेऊन चौकशीसाठी पाठवला आहे.

नेमकं काय घडलं - 

ही घटना चंदवा पोलीस ठाणे (Chandwa Police Station) परिसरातील परसाही गावातील आहे. इथे शनिवारी रात्री अनिल गंझु यांच्या दोन मुलींनी पॅकेटमध्ये बंद असलेले मिक्सरच आणि रिंग्स कुरकुरे खाल्ले होते. सृष्टी (वय - दीडवर्ष) आणि आराध्या (वय - 4 वर्ष) असे या दोन मुलींचे नाव आहे. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिक्सचर आणि कुरकुरे खाल्ल्यानंतर दोघांना झोप आली. रात्र झाल्यामुळे दोघांना झोप येत असेल, असे त्यांच्या घरच्यांना वाटले. यानंतर त्या दोन्ही मुलींना झोपवून घरातील लोकही झोपून गेले.

मात्र, रविवारी सृष्टिची तब्येत खराब झाली होती. यानंतर घरातील लोकांनी तिला लगेचच सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, प्राथमिक उपचार केल्यानंतरही तिची गंभीर अवस्था पाहून तिला रिम्स येथे दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून रांची येथे पाठवण्यात आले. यानंतर अर्ध्या तासानंतरच दुसरी बहीण आराध्या हिचीदेखील तब्येत बिघडली. तिलादेखील आनन-फानन येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची गंभीर अवस्था पाहून तिलासुद्धा रांची येथे पाठवण्यात आले. मात्र, यानंतर एक धक्कादायक घटना घडली. रिम्स येथे उपचारादरम्यान, रविवारी संध्याकाळी सृष्टिचा मृत्यू झाला. यानंतर रिम्स प्रशासनाने तिचा मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर सोमवारी तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तर दुसरी बहीण आराध्या हिची प्रकृती सध्या गंभीर आहे.

तर सोमवारी सकाळी याच गावातील महेंद्र गंझू यांच्या मुली रितिका (वय - साडेचार वर्ष) आणि श्वेता (वय - दोन वर्ष) या दोघांनीही याच दुकानातून मिक्सचर आणि रिंग्स कुरकुरे विकत घेऊन खाल्ले. यानंतर या दोघांचीही तब्येत बिघडली. यांनादेखील सुरुवातीला आनन फानन येथील सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना रिम्स येथे रेफर पाठवण्यात आले. रितिका कुमारी आणि स्वेता कुमारी या दोघांची तब्येत गंभीर आहे.

हेही वाचा - पहाटे 3 वाजता पत्नीच्या डोक्यात घातली गोळी; काँग्रेसच्या माजी प्रवक्त्याचं धक्कादायक कृत्य

या घटनेनंतर चदंवा सीएससी यांच्या आरोग्य पथकाने गावातील दुकानात जाऊन तपास केला. तसेच दुकानात विकल्या जाणाऱ्या मिक्सचर आणि रिंग्स कुरकुरे याचा नमुना घेऊन तपासासाठी पाठवला आहे. चंदवा सामुदायिक आरोग्य केंद्राचे डॉ. नन्द कुमार पांडेय यांनी सांगितले की, प्रकरणाचा पूर्ण तपास केला जात आहे. ही घटना विषबाधेची आहे. आम्ही हे दोन्ही पदार्थ जमा करून चौकशीसाठी पाठवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Jharkhand, Poison, Processed food